Odisha Railway Accident Train Video: ओडिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १००० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला गॅस कटरच्या मदतीने मृतदेह काढावे लागले होते. या भीषण अपघातानंतर घटना कशी घडली याबाबत अनेक तर्क वितर्क काढले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध व्हायरल व्हिडीओजमधून अपघातानंतरची हृदय पिळवटून टाकणारी दृश्य शेअर करण्यात आली होती. मात्र आता पहिल्यांदाच अपघाताच्या पूर्वीचा ट्रेनमधील एक व्हिडीओ असे कॅप्शन असलेली क्लिप समोर येत आहे. माध्यमांनी संबंधित व्हिडीओ हा ट्रेन अपघात घडण्यापूर्वी ट्रेनच्या एसी कोच मध्ये शूट करण्यात आला होता असे सांगितले आहे. व्हिडिओचा शेवट पाहून अंगावर काटा येऊ शकतो.

कसा घडला होता ओडिशा रेल्वे अपघात?

कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला जाऊन धडकली. त्या गाडीच्या इंजिनसह काही डबे मालगाडीवर चढले. ट्रेन पूर्ण वेगात होती. तर मालगाडी खूप वजनदार होती. त्यामुळे मालगाडी जागची हलली नाही. उलट प्रवाशांना घेऊन जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर चढली.या अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे इकडे तिकडे पडले. या गाडीचे दोन डबे बाजूच्या लाईनवर पडले. या लाईवरून यशवंतपुरा एक्सप्रेस जाणार होती. यशवंतपुरा एक्सप्रेस १२६ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावत येत होती. मार्गात पडलेल्या कोरोमंड एक्सप्रेसच्या डब्यांना यशवंतपुरा एक्सप्रेस धडकली. त्यामुळे यशवंतपुरा एक्सप्रेसचादेखील अपघात झाला

ओडिशा रेल्वे अपघाताच्या आधी ट्रेनमध्ये काय घडलं?

हे ही वाचा<< ओडिशा रेल्वे अपघात टाळण्यासाठी ५३ वर्षीय अपंग माणूस सहा किलोमीटर धावला? कौतुक केल्यावर कळलं की खरं त्याने…

व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडीओ खरोखरच अपघात झालेल्या ट्रेनमधील आहे असे अंदाज बांधले जात आहेत. तूर्तास, या दुर्घटनेचा तपास पूर्ण झाला असून दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या लोकांवर लवकरच कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha railway accident video just few seconds earlier train ac coach footage before crash of kormandel express balasore svs
First published on: 08-06-2023 at 16:07 IST