Viral video: आयुष्य हे तसं पाहिलं तर आयुष्य हा एक प्रवासच असतो. प्रत्येक व्यक्तीला तो करावाच लागतो. अगदी लहानपणापासूनचा हा प्रवास अगदी स्वतःच्या नकळत येणाऱ्या प्रत्येक दिवसा बरोबर करावा लागतो.. तसे पाहायला गेलं तर आयुष्याच्या प्रवासाचं वर्णन करणं सोपं नाही. प्रत्येकाचेच आयुष्य वेगळे असते आयुष्याचा प्रवासही वेगवेगळाच म्हणायचा. ह्या प्रवासात वेगवेगळी वळणे येत असतात पण ह्या प्रवासाची खरी गमंत म्हणजे प्रत्येकाचाच प्रवास हा अगदी भिन्न असतो. काहींसाठी हा प्रवास खडतर तर काहींसाठी खूप मजेशीर असतो. काहींना ह्या प्रवासाचा हेवा वाटतो तर काहींना तो नकोसा वाटतो. युष्य कुणासाठीच न थांबणार सतत पुढे जात राहणारं.. आयुष्य प्रत्येक पावलावर नवं काही शिकविणार, अनुभवाचे धडे देणार आणि आठवणीची शिदोरी देणार आयुष्य.. हेच आयुष्य पावला पावलावर जगणं शिकवणारं असतं.

आयुष्याचे दोन टप्पे असतात एक तारुण्य आणि एक म्हातारपण..यामध्ये जगलेला काळ हेच खरं आयुष्य. अशाच दोन वेगवेगळ्या टप्प्यावर असणाऱ्या दोन जोडप्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, यालाच तर आयुष्य म्हणतात!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नुकतंच लग्न झालेलं जोडपं फोटो काढत आहे. आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करताना या आठवणी आयुष्यभर साठवून ठेवण्यासाठी नवरा नवरीचे फोटोशूट सुरु आहे. हे दोघेही आता नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत. दरम्यान याचवेळी शेजारी असणाऱ्या इमारतीतून एक वृद्ध जोडपं या नवीन जोडप्याकडे पाहत आहेत. कदाचीत दोघांनाही या जोडप्याला पाहून त्यांचं तारुण्य आठवलं असेल. कधीकाळी त्यांनीही असचं लग्न केलं होतं आणि या प्रवासाला आज इतकी वर्ष झाली. अशाप्रकारे प्रत्येकाचं हे वर्तुळ वेळेनुसार पूर्ण होत असतं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shadow_picturess नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “किती सुंदर video आहे…. त्यांना पण आठवलं असेल त्यांचं लग्न आणि नवीन जोडप्याने पण असच एकमेकाला साथ द्यावी ही पार्थना त्यांनी मनोमनी केली असेल.” तर आणखी एकानं, “तुम्हालाही इथून तिथं पर्यंत जाण्याच्या खूप खूप शुभेच्छा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.