Viral Video : पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असतात. या नात्यात प्रेम, काळजी,जिव्हाळा आणि आपुलकी असते. लग्नानंतर पती पत्नी नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि आयुष्यभर साथ देण्याचे एकमेकांना वचन देतात. सध्या अशाच एका वृद्ध पती पत्नीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी आजोबांना चालताना मदत करत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (old lady helps his old husband for walking emotional video of husband wife)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजोबांना दोन्ही पायांनी चालता येत नाही त्यामुळे आजोबा चारचाकी सायकलवर बसले आहेत. दोन्ही हातात चप्पल घातली आहे आणि चपलेने स्वत:ला पुढे चालण्यासाठी धक्का देत आहे. त्यांच्यामागे त्यांची वृद्ध पत्नी आहे ती सुद्धा त्यांना सायकल पुढे नेण्यात मदत करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. काही लोक हा व्हिडीओ पाहून भावूक होतील. आयुष्यभर साथ देणारे हे असे खरे प्रेम सध्या खूप कमी पाहायला मिळते. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हेच ते प्रेम जे कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत साथ सोडत नाही” हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल की असा मरेपर्यंत साथ देणारा जोडीदार पाहिजे.

हेही वाचा : जावई असावा तर असा! कोरियन जावयाने सासू-सासऱ्यांसाठी बनवला गरमा गरम मसाला चहा, पाहा Viral Video

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “स्त्री पुरुष समानता कागदोपत्री..”, वटपौर्णिमेनंतर पिंपरीतील महिलांनी मांडलं परखड मत; पुरुषांचं अनोखं सेलिब्रेशन पाहा

shailesh_sathe_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शेवट पर्यंत साथ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच हा व्हिडिओ पाहून अक्षरक्ष: डोळ्यात पाणी आलं आज कालच्या या स्वार्थी दुनियेत नि:संकोचपणे प्रेम करणारी व्यक्ती मिळायला भाग्य लागते” तर एका युजरने लिहिलेय, “आईवडिलांना कधीच सोडू नका सगळे साथ सोडतील पण ते कधीचसाथ सोडणार नाहीत” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण आपल्या जोडीदाराची साथ मात्र आयुष्यभर पाहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भावूक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.