Old Lion Viral Video : जंगलचा राजा सिंहाला सगळेच घाबरतात, त्याची डरकाळी ऐकून भल्याभल्यांना घाम फुटतो, त्यामुळे जंगलातील इतर प्राण्यांसह माणूसही सिंहापासून दूर राहण्यातच भलं समजतात. सिंह हा धाडस, ताकद आणि वेगवान गतीसाठी ओळखला जातो, जो कोणत्याही प्राण्याला क्षणात आपली शिकार बनवतो. पण, सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध सिंहाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक भावूक झाले आहेत. कारण जंगलात एकेकाळी राजाप्रमाणे वावरणाऱ्या सिंहाची अवस्था फार बिकट झाली आहे.

एका वृद्ध सिंहाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. संथ गतीने चालणाऱ्या वृद्ध अशक्त सिंहाची अवस्था पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सिंह संथ गतीने चालत असून वयाचा प्रभाव त्याच्या शरीरावर स्पष्टपणे दिसत आहे. निसर्गातील प्रत्येक सजीव एका चक्रातून जात असतो, याची जाणीव या दृश्यातून होते.

Young man died due to electric wire shocking video goes viral on social Media
विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Funny Viral Video Of Man
झोपण्याची ही कोणती पद्धत? अंथरूण घालून असा झोपी गेला की…; लोकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं, VIRAL VIDEO पाहून येईल हसू
a child playing amazing dholaki video goes viral
नाद असावा तर असा! अफलातून ढोलकी वाजवतो हा चिमुकला, VIDEO एकदा पाहाच
Shocking video 'Kali Dal' Turns Water Black; Himachal Pradesh woman Records Adulteration Incident In Viral Video
“जगायचं की नाही?” रात्रभर भिजवलेल्या मुगाचं सकाळी काय झालं पाहा; VIDEO पाहून मूग घेताना शंभर वेळा विचार कराल
Video: Nearly 25 Bikes Skid In Hyderabad After Oil Tanker Spills Fuel On Kushaiguda-Nagaram Road shocking video
भयंकर! एका मागोमाग २५ बाईकचा थरारक अपघात; भर रस्त्यात असं नेमकं काय घडलं? VIDEO पाहून थरकाप उडेल
Groom Dancing With His Pet Dog In Viral Video
नवऱ्याची निघाली वरात! वरातीत नाचताना ‘त्याने’ पाळीव श्वानाला उचलून घेतलं अन्… पाहा VIRAL VIDEO
Dog play Viral Video
पुणे तिथे काय उणे! पुण्यातील मॉलमध्ये श्वानाचा खेळ; VIDEO पाहून येईल हसू

एक वृद्ध आणि अशक्त सिंह रस्त्यावर आरामात चालताना दिसतोय

व्हिडीओमध्ये एक वृद्ध आणि अशक्त सिंह रस्त्यावर आरामात चालताना दिसत आहे. यावेळी त्याच्या समोर कारमध्ये बसलेले लोक त्याचा व्हिडीओ बनवत आहेत, तरीही तो शांतपणे आणि थांबून चालतो.
म्हातारा झालेल्या सिंहाला पाहून असे दिसते की, वयाच्या या टप्प्यावर त्याला अगदीच असहाय्य वाटत आहे. त्याच्या कमजोर शरीरामुळे आणि वृद्धत्वामुळे त्याला वेगाने धावणं सोडा, चालणंही खूप अवघड जात आहे. सिंह सरासरी वयाच्या २५ वर्षांपर्यंत जगतात. पण, १२ वर्षांनंतर ते शरीराने हळूहळू कमकुवत होऊ लागतात.

“कितीही बलवान असलात तरी वेळेपुढे सगळे झुकतात”, युजरची प्रतिक्रिया

सिंहाचा हा भावनिक व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, यावर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “हे पाहून माझे हृदय तुटते, परंतु तो एकटा का आहे हे मला समजले. जर तो थांबला तर त्याचा स्वाभिमान धोक्यात येईल, आपली प्रजाती वाचवण्यासाठी त्याला एकटेच जगावे आणि मरावे लागेल. प्राण्यांच्या जगात ही एक सामान्य गोष्ट आहे, हे आपल्या सुरुवातीच्या पूर्वजांनादेखील लागू होते.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “तुम्ही कितीही बलवान असलात तरी वेळेपुढे सगळे झुकतात.”

बाबरी मशीद विध्वंसाच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांसह होते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? Viral Photo मुळे चर्चांना उधाण; पण खरं काय, वाचा

तिसऱ्या एका युजरने लिहिले की, “वृद्धत्व ही खरोखरच वेदनादायी गोष्ट आहे.” आणखी एकाने लिहिले की, “शेवटच्या क्षणीही सिंहाचे असे चालणे हे दर्शवते की, हा प्राणी किती अद्भुत जीवन जगला असेल.” शेवटी एका युजरने लिहिले की, “राजा, तुम्ही तुमचे काम केले आहे, ही जबाबदारी आता येणाऱ्या पिढ्यांवर सोपवण्याची वेळ आली आहे.”

Story img Loader