scorecardresearch

Viral: आजोबांच्या बाइक स्टंटची सोशल मीडियावर ‘धूम’, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर स्टंट आणि डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. मात्र वयोवृद्ध लोकांचे व्हिडीओ लक्ष वेधून घेतात.

Old_Man_Stunt
Viral: आजोबांच्या बाइक स्टंटची सोशल मीडियावर 'धूम', व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर स्टंट आणि डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. यापैकी वयोवृद्ध लोकांचे व्हिडीओ लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक वयोवृद्ध आजोबा बाइकवर स्टंट करताना दिसत आहे. त्यांनी केलेले स्टंट पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओला लाखो लोकांची पसंती मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक वयोवृद्ध व्यक्ती बाइकवर बसून कुठेतरी जात आहे. मात्र या दरम्यान स्टंट करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर दोन्ही हात सोडून लांबपर्यंत गाडी चालवतात. त्यात गाडीवर अनेक उभे राहून जोरात बसतात. कधी मागे झोपण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर पडण्याची कोणतीही भीती दिसत नाही. हसत हसत स्टंट करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. तर काही जणांनी असे जीवघेणे स्टंट करू नका असे सल्ले दिले आहेत.

काही सेकंदांच्या व्हिडीओला आतापर्यंत ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओखाली अनेकांनी मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Old man bike stunt video viral on social media rmt

ताज्या बातम्या