Viral Video : असं म्हणतात नवरा बायकोचं प्रेम हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकी असते. दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. खरं तर आयुष्यभर साथ देणारा जोडीदार मिळायला नशीब लागते. निस्वार्थ प्रेम करणारा जोडीदार मिळायला भाग्य लागते.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वटवृक्षाची पूजा करण्यासाठी आजोबा स्वत: आजीला गाडीवर घेऊन आले. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : डोळ्यासमोर घर उद्ध्वस्त होताना बाळाला मांडीवर घेऊन आईचा आक्रोश; अयोध्या नव्हे महाराष्ट्रातच झाली होती कारवाई, पाहा सत्य

नुकतीच वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेला पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करते. अशाच एका आजीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वृद्ध पती पत्नीचे निस्वार्थ प्रेम दिसून येत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वृद्ध जोडपे घरी तुळशीची पूजा करताहेत. काकांना एक पाय नाही त्यामुळे त्यांच्या हातात कुबडे दिसत आहे. त्यानंतर आजोबा स्कुटीवरून आजीला एका वडाच्या झाडाजवळ घेऊन जातात. आजोबा हातात कुबडे घेऊन चालताना दिसतात. तेव्हा आजी् त्यांना साथ देत त्यांच्या खांद्यावर हात ठेवते. त्यानंतर आजोबा वडाच्या झाडाजवळ बसतात आणि आजी त्यांच्यासमोर वडाच्या झाडाची पूजा करतात. आजोबा हे सर्व कौतुकाने पाहत असतात. त्यानंतर आजी त्यांच्या पाया पडते आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसते.

हेही वाचा : जंगलात ठेवला होता आरसा; स्वतःला पाहून बिबट्याने जे केले ते पाहून तुम्हीही जोरजोरात हसायला लागाल!

दोघांच्याही चेहऱ्यावरील हसू पाहून कोणीही थक्क होईल. नऊवारीत आजी खूप सुंदर दिसत आहे. तर आजोबांनी पांढरा शुभ्र सदरा अन् पायजमा घातला आहे. ही वृद्ध आजी आजोबांची जोडी समाजासमोर एक आदर्श आहे.

पाहा व्हिडीओ

ruchika_khamkar_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मोरपंखी चाहुलींचे सोबतीने राहणे…साता जन्माची गाठ बांधून झाले पावन मी, नेहमी सोबत आनंदी राहो आपण सहजीवनी… वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जगात बापासारखी छाया आणि आई सारखी माया कुठेच भेटायची नाही आणि आपल्या हिंदू धर्मा सारखी संस्कृती शोधून पण सापडणार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खूप भारी वाटलं पाहून सगळ्यांच्या आयुष्यात असंच जोडीदार असावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ होता…. निस्वार्थ प्रेमाची मूर्तिमंत उदाहरण देणारी पिढी….खूप छान वाटलं पाहताना… परमेश्वर दोघांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना….. “