प्रत्येक व्यक्ती प्रेम मिळवण्यासाठी धडपडत असतो पण प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे मात्र बऱ्याच लोकांना माहित नसते. अनेक तरुण-तरुणी चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या प्रेम कथा पाहून भुलतात पण खऱ्या आयुष्यात प्रेम म्हणजे काय जाणून घ्यायचे असेल तर वर्षांनुवर्ष संसार करणाऱ्या आपल्या आजी-आजोबा आणि आई-वडीलांकडे एक बघा. आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरीही एकमेकांची नेहमी साथ देतात हेच खरे प्रेम असते. सध्या अशाच एका आजी-आजोबांच्या सुंदर नात्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबांनी आजींसाठी उखाणा घेतला आहे.

सहसा महिला आपल्या पतीसाठी उखाणा घेतात पण आजोबांनी आपल्या पत्नीसाठी उखाणा घेऊ अनेकांची मन जिंकले आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आजी-आजोबांशी संवाद साधत आहे. दरम्यान उखाणा घ्यायला सांगितल्यानंतर आजोबा आजींसाठी एक भन्नाट उखाणा घेतात. “तुपात तूप गायीचे सोजरीच्या वेणीला फुल जाईचे” आजी आजोबांच्या नात्यातील साधेपणा आणि निस्वार्थ प्रेम दर्शवणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

हेही वाचा –“हॉर्नचा वापर कमी करा, इथे कोणी….” सतत हॉर्न वाजवणाऱ्यांवर वैतागले रिक्षावाले काका! रिक्षामागे लावली पुणेरी पाटी, Video Viral

u

हेही वाचा –Video : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर भक्तांची भली मोठी रांग

व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी आजोबांचे कौतुक केले आहे.
एकाने कमेंट केली, “निखळ झऱ्यातील नितळ पाण्यासारखे आयुष्य जगलेली माणसे”

दुसऱ्याने कमेंट केली, “काय प्रेम आहे!”

तिसऱ्याने कमेंट केली,” खूप छान उखाणा घेतला काकांनी”

चौथ्याने कमेंट केल, “अशी साधी माणसं पुन्हा बघायला मिळणार नाही”

Story img Loader