Viral Post: सोशल मीडियावर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या अशीच एक विचार करायाला लावणारी एक घटना समोर आलीय जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या घटनेने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये एक आजोबा रस्त्यावर समोसे विकत बसले आहेत, त्यांचा हा फोटो पाहून प्रत्येकालाच त्यांची दया येतेय. त्यांचा हा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल की या आजोबांना या वयातही का कष्ट करण्याची वेळ आलीय. त्यांना किती संघर्ष करावा लागतोय. पण याची एक दुसरीच बाजू आहे. ही बाजू ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते काही कमी नाहीत. पण उतारवयातही असं काम करणारे हे आजोबा चर्चेत आले आहेत. जे भरपावसातही रस्त्यावर गरमागरम समोसे आणि पोहे विकत आहेत. एका व्यक्तीने त्यांना पाहिलं. या वयात इतक्या पावसात काम करण्याची काय गरज आहे. आराम करायचा, असा सल्ला देणाऱ्या एका व्यक्तीसह सर्वांनाच त्यांनी आयुष्याचा एक धडा दिला. आपण हे काम पैशांसाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

तुमचाही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल

या व्यक्तीने या आजोबांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचा हा किस्सा सांगितला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ही व्यक्ती म्हणाली, “राजस्थानच्या उदयपूरच्या रस्त्यावर दिसलेले हे आजोबा. या व्यक्तीने “मी माझ्या कारमध्ये कोर्ट सर्कल उदयपूरजवळून जात होतो. तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. तिथं मला एक वृद्ध काका गरम समोसे आणि पोहे देताना दिसले. त्यांना पाहताच माझ्या मनात एक विचार आला की त्यांची काही गरज असावी. मी त्यांच्या जवळ गेलो आणि विचारलं की आज इतक्या पावसात तुम्ही आराम का केला नाही? त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकल्यानंतर माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला”

आजोबा नेमकं काय म्हणाले ?

या व्यक्तीनं सांगितलं की. ते आजोबा त्याला म्हणाले, “बेटा, मी पैशांसाठी एवढी मेहनत करत नाही. मी फक्त माझ्या मनाला आनंद देण्यासाठी काम करतो. घरी एकटं बसण्यापेक्षा इथं बसणं चांगलं. माझ्याकडील पदार्थ खाल्ल्यावर चार लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद जेव्हा मी पाहतो तेव्हा मलाही आनंद होतो, त्यांचे आनंदी चेहरे पाहिल्यावर मन प्रसन्न होतं”

पाहा पोस्ट

हेही वाचा >> Badlapur Case VIDEO : बदलापूरकरांनी घडवलं माणुसकीचं दर्शन; पाहा १० तास रेल्वे सेवा बंद असताना काय घडलं?

आपण सर्वच पैशाच्या मागे धावत असतो, पैसा म्हणजेच सर्वकाही यामध्ये आपण गुंतलो आहोत आणि त्याचाच पाठलाग करतो. मात्र या सगळ्यात आपण आपल्या जवळच्या माणसांना मात्र विसरतो किंवा गृहीत धरतो. मात्र आता या आजोबांकडून कारण ऐकून तुमचाही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल.