Viral video: सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.रस्त्यावर एखादा तरुण माणूस भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की ’हट्टकट्टा तर आहेस, भीक का मागतोस? काम का नाही करत.’ आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुर्मी दाखवतो. मात्र एक आजोबा या वयातही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एकीकडे आजोबांना एवढं कष्ट करताना पाहून आपल्या वाईट वाटतं मात्र हेच आजोबा कष्टाच्या घामातही भक्तीचा सुगंध शोधत आहेत. तो कसा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर तुम्हीच पाहा हा व्हिडीओ..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता सुंदर असा अभंग गात आहेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, विट भट्टीवर विटांवरच बसून हे आजोबा गाणं गात आहेत.यावेळी ते त्यांच्या कामाचा पूर्णपणे आनंद घेतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.
आपल्या घरासाठी मुलांसाठी हे आजोबा या वयातही कष्ट करत आहेत, हे पाहून वडिलांच्या संघर्षाची जाणीव होते. आपण आजूबाजूला धडधाकट लोक भीक मागताना पाहतो, तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेली पाहतो. मात्र हे आजोबा अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळातही स्वत:हा कमवून खात आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोटिवेशन मिळालं आहे.आई-वडील आपल्या मुलांना मोठं करण्याासाठी कष्ट करतात, रात्रीचा दिवस करतात. काही मुलं आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करतात तर काहीजण आई-वडिलांच्या शेवटच्या काळात साथ सोडतात. अशावेळी वंशाच्या दिव्याचं करायचं काय असा प्रश्न पडतो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ gajanan_chat_bhandar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन व्ह्यूज गेले आहेत. अनेकजण यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
