Viral video: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भायवह अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. डान्स रिल्सचे तर अनेक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये अगदी वयोवृद्ध लोक देखील भन्नाट अशा एक्सप्रेशन आणि स्टेप्ससह डान्स करत असतात. सध्या असाच एक काकांच्या डान्सचा भन्नाट असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये काका मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या काका काकींचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे काका अगदी वय विसरून तरुण होऊन काकींसोबत मनसोक्त नाचताना दिसत आहेत. यावेळी काकीही काकांबरोबर त्यांना साथ देताना दिसत आहेत. या वयातही त्यांच्यातला उत्साह आणि प्रेम हे पाहण्यासारखं आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर nidsway या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की, आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
