पावसाळा सुरू झाल्यापासून आपल्याला आसपास साप आढळतात. कधी हेल्मेटमध्ये, कधी गाडीच्या डिक्कीमध्ये, शूजमध्ये साप आढळल्याचे अनके व्हिडीओ समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घराच्या टाकीमागे, किंवा छताच्या कोपर्‍यात अनेक साप दिसल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये सापाचे भय निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये एक भयावह व्हिडिओ समोर आला आहे. नवी मुंबईतील मुसळधार पावसानंतर भरलेल्या रस्त्यांवरील साचलेल्या पाण्यात एक मोठा, विषारी अजगर आढळल्याचे डिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, साचलेल्या पावसाच्या पाण्यात एक अजगर शांतपणे डोकावताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईतील लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की एका रस्त्यावर पाणी साचलेले आहे. पाण्यातून गाड्यांची ये-जा सुरू आहे. दरम्यान जस जसा कॅमेरा झूम होतो तस तसा पदपथाच्या कोपऱ्यावर एका सापाने डोके ठेवल्याचे दिसते. साप पाण्यामध्ये बुडालेला आहे आणि पाण्यातून फक्त डोके बाहेर काढून डोकावत आहे. हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या एकाने कॅमेऱ्यात कैद केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

हा व्हिडिओ @sarpmitr_ashtvinayak_more या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर “रॉक पायथॉन..” या कॅप्शनसह शेअर केला आहे आणि तेव्हापासून त्याला ६.७ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि २,६८,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

पाहा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत

एकाने मजेशीर टिका करत म्हटले की मला पायथॉन(प्रोग्रामिंग भाषा) माहित आहे. मी बोलू का त्याच्याशी.

सध्या मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादावरून एकाने खोचक टिका केली,”लोक सापालाही मराठी भाषेत बोलण्यास भाग पाडत आहेत का? त्यांनी प्राण्यांवर दया दाखवले आहे.”

“बिचारा किती घाबरलेला दिसत आहे”, असे मत तिसर्‍याने व्यक्त केले.

कृपया वन विभाग किंवा सर्प मित्राला बोलवा. सापाला बहुदा खूप ताण आला असेल. त्याला एखाद्या वाहनामुळे दुखापत होऊ शकते. तो पाण्यात नीट दिसतही नाही, असे आणखी एकाने कळकळीने सांगितले.

“ते आपल्याभोवती असतात, आपण त्यांच्याकडे ९९% वेळा दुर्लक्ष करतो. जर त्यांनी आपल्याबरोबर (मानवी वस्तीत) राहण्यास अनुकूलता दर्शविली असेल, तर आपण नैसर्गिक क्षेत्रे नैसर्गिक राखून ठेवली पाहिजेत आणि केवळ अनावश्यकपणे बांधकाम करत राहू नये,” असे पाचव्या वापरकर्त्याने म्हटले.

मुंबईत पावसाळ्यात अजगर दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये आरे कॉलनी जंगलाजवळ सहा फूट लांबीचा भारतीय रॉक पायथॉन (अजगर) रस्ता ओलांडताना दिसत होता.

अनेक पर्यावरणीय आणि जैविक कारणांमुळे पावसाळ्यांनंतर साप सामान्यत: दिसतात. जेव्हा मुसळधार पाऊस त्यांच्या जमिनीखाली बिळांमध्ये पाणी भरतो, तेव्हा ते उंच किंवा कोरड्या भागात जाण्यास भागात जातात. म्हणून ते बहुतेकदा मानवी वस्तीत येतात. वादळानंतर रस्त्यावर किंवा बागेत साप दिसण्याचे हे एक सर्वात सामान्य कारण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यांनंतरचे वातावरण सापांसाठी देखील आदर्श आहे. थंड रक्ताचे प्राणी म्हणून, साप त्यांच्या शरीराची उष्णता नियंत्रित करण्यासाठी बाह्य तापमानावर अवलंबून असतात. पावसाळ्यानंतर ओलसर, थंड वातावरण त्यांना अधिक आरामात हालचाल करण्यास आणि शरीरातील पाण्याची पातळी राहण्यास मदत करते.