हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर महाकाय डायनासोर अस्तित्वात होते. असे अनेक पुरावे आपल्याला जगभरातून मिळत आले आहेत. याबाबत अनेक चित्रपट आणि पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. महाकाय डायनासोर नामशेष झाल्याचं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अशातच आता एका अंड्यातून डायनासोरचं पिल्लू बाहेर पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण होऊ लागलेत. मात्र या व्हिडीओमध्ये डायनासोरचं पिल्लू आहे यावर अद्याप खात्री झालेली नाही. सोशल मीडियावर सध्या यावर चर्चेला उधाण आलं असून प्रत्येक जण आपआपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला कात्रीने अंडी हळूच फोडते, त्यानंतर एक तपकिरी रंगाचा प्राणी अंड्यातून बाहेर येतो. हा डायनासोरचा पिल्लू आहे की काय असा भास होऊ लागतो. या प्राण्याचं तोडं अगदी हुबेहूब डायनासोर सारख दिसून येतंय.

आणखी वाचा : ऐकावं ते नवलंच! आजोबांनी बांधलं कुत्र्याचं अनोखं मंदिर, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

काहींनी या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या प्राण्याला अजगर म्हटलंय, तर काहींनी हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलंय. या व्हिडीओमध्ये कोणता प्राणी आहे आणि हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सध्या या व्हिडीओवरून युजर्समध्ये वाद सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्रयोगशाळेत शूट करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर एकदा हा व्हिडीओ पाहाच.

हा व्हिडीओ cutepetswild नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. “हा खरा डायनासोर आहे की बनावट? मला कमेंट्समध्ये कळवा.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी अपलोड झालेल्या या व्हिडीओला १४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. नेटिझन्स या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ खरा की खोटा याबाबत कमेंट सेक्शनमध्ये चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा : या दिव्यांग आजोबांच्या इच्छाशक्तीला जगाचा सलाम, हा VIRAL VIDEO जिंकेल तुमचंही मन

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रस्त्यावर फिरताना दिसला कांगारू, हा VIRAL VIDEO पाहून लोक विचारू लागले, ‘भारतात कसा आला?’

एका युजरने म्हटलंय की, “हा डायनासोर नसून ड्रॅगन आहे. लोकांना घाबरवणे थांबवा”, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “लाखो वर्षांपूर्वी डायनासोरचे अस्तित्व संपले आहे, हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट आहे”. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.