Viral video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सोशल मीडियावर मगरीचे अनेक व्हिडिओ येत असले तरी हा व्हिडिओ वेगळा आणि धोकादायकही आहे.

व्हिडिओमध्ये चिमुकला मुलगा धावत जाऊन तलावाच्या दिशेने धावतो आणि यानंतर असं काही करतो की पाहून त्या दृष्यांवर लोकांचा विश्वासच बसत नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मुलगा पाण्यात जाऊन चक्क मगरीचे दात घासू लागतो. होय हे खरं आहे…

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा आवाज देत पाण्याच्या दिशेने धावताना दिसतो, तो वेगाने पाण्यात जातो आणि पुढील दृष्यातच आपल्याला पाण्यातून एक मगर बाहेर येताना दिसते. मगरीला पाहताच तो तिच्या जवळ जातो आणि मगरीचे दात घासायला सुरुवात करतो. मुलगा अजिबात असं करताना घाबरत नाही आणि मुख्य म्हणजे, मगरही गूपचूप त्याला कोणतीही इजा न करता त्याच्याकडून फ्रीमध्ये दात साफ करुन घेते. हे दृष्य पाहणे फारच रंजक ठरते. पाण्याचा राक्षस म्हणून ओळखली जाणारी मगर एका चिमुकल्याकडून दात साफ करत आहे हे पाहून लोकांना हसू आलं, तर काहींना या दृष्यांवर विश्वासच बसेनासा झाला. सोशल मिडियावर आता या व्हिडिओला चांगलेच शेअर केले जात आहे. या मगरीचा आकार पाहिलात तर तोही खूप मोठा आहे, चुकुन जरी हा मुलगा मगरीच्या तावडीत सापडला असता तर त्याचा मृत्यू हा निश्चित होता. दरम्यान असे स्टंट करणं धोकादायक असून यामध्ये जीव जाण्याचीही भिती असते.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.