ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन कधी-कधी अशा वस्तू विकते, ज्या पाहून लोकांना विश्वासच बसत नाही. शेणाच्या गोवऱ्या, झाडाची पाने, बाथरूमच्या महागड्या बादल्यांसह अनेक गोष्टी यापूर्वी अशा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर विकल्या गेल्या आहेत. आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये अ‍ॅमेझॉनने आपल्या वेबसाइटवर दगडांची यादी सादर केली आहे. सहसा असे दगड तुम्हाला कोणत्याही डोंगराळ भागात मिळतील, परंतु अ‍ॅमेझॉन आपल्या वेबसाइटवर हे दगड विकत आहे.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अ‍ॅमेझॉनने या दगडांच्या किमती देखील खूप महाग ठेवल्या आहेत. लोक आपली घरे सजवण्यासाठी काळ्या नदीचे पॉलिश न केलेले दगड वापरतात. मात्र, हे खडे ३३ टक्के सवलतीने उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉनने ३ किलो दगडांची किंमत ४९९ रुपये दिली आहे. विशेष म्हणजे ही किंमत सवलतीनंतर उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत ७४० रुपये आहे. ऑर्डर दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांत हे दगड डिलिव्हरीच्या पत्त्यावर पोहोचेल. घराच्या सजावटीसाठी, लोक त्यांच्या घराच्या लाकडी टेबलांवर ठेवण्यासाठी दगड वापरतात. दगडांची ऑनलाइन विक्री ही लोकांसाठी आश्चर्यचकित करणारी बाब आहे.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Employer killed owner for non-payment of wages
ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या
Video Make 50 Rice Papad With 1 Cup Cooked Rice Recipe
एक वाटी उरलेल्या भाताचे ५० पळी पापड करून तर पाहा; १५ मिनिटांची रेसिपी आणि चव तर अहाहा, पाहा Video
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

3kg stones for 500 rs
अ‍ॅमेझॉन आपल्या वेबसाइटवर हे दगड विकत आहे. (Photo : Amazon in)

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

अ‍ॅमेझॉनवर सूचीबद्ध केलेल्या या दगडांच्या विक्रीवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘तुम्हाला पहिला ग्राहक सापडला की नाही? तुम्ही तीन किलो दगड पाचशे रुपयांना विकत आहात. शेतकऱ्याच्या कांदा, बटाटा, टोमॅटोलाही हा भाव मिळावा, हीच प्रार्थना. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले. ‘आमच्याकडे येथे तीन मोठ्या नद्या आहेत. ज्यांना या दगडांची गरज असेल, त्यांनी इथून फुकट घेऊन जा.’ सोशल मीडियावर ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.