सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही थक्क करणारे. शिवाय काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केवळ तीन दिवसांची नवजात मुलगी हॉस्पिटलमधील कॉटवर रांगताना दिसत आहे. या मुलीला रांगाताना पाहून तिच्या आई देखील आश्चर्यचकित झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलीच्या आईचे नाव सामंथा मिशेल आहे, तर मुलीचे नाव नायला असं आहे. सामंथा यांनी जेव्हा आपल्या तीन दिवसांच्या मुलीने शरीराला आधार देण्यासाठी आपले हात बाहेर काढल्याचं आणि डोके वर उचलल्यांच पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. व्हाईट ओक, पेनसिल्व्हेनिया येथे राहणाऱ्या सामंथा यांनी आपल्या मुलीचा रांगतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- बसनंतर आता आली डबल डेकर सायकल! व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, ”आजोबा जुगाड जबरदस्त आहे पण…”

या घटनेनंतर सामंथा यांनी सांगितले की, मी पहिल्यांदा नायलाला रांगताना पाहिले तेव्हा मला धक्का बसला. त्या पुढे म्हणाल्या, “नायला ज्या प्रकारे डोके वर काढून रांगायला लागली, ते पाहून मला पूर्ण धक्का बसला. जेव्हा हे घडले तेव्हा खोलीत मी आणि माझी आई दोघीच होतो. यावेळी आईने मला नायलाचा रांगतानाचा व्हिडीओ शूट करायला सांगितले. शिवाय हा व्हिडीओ शूट केला नसता तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. नायलाने रांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पूर्ण तीन दिवसांचीही झाली नव्हती, तीला फक्त अडीच दिवस पुर्ण झाले होते. महत्वाची बाब म्हणजे, नायलाचा जन्म २७ फेब्रुवारी २०२३ रोजी तीन आठवडे उशिरा झाला होता. लहान मुले सहसा वयाच्या नऊ महिन्यांपासून पुढे रांगायला सुरूवात करतात, मात्र नायला तीन दिवसांची असतानाच रांगायला लागल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- UPSC मध्ये देशात पहिली आलेल्या इशिता किशोरची मार्कशीट पाहिलीत का? फोटो होतोय व्हायरल

सामंथाने सोशल मीडियावर नायलाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, शिवाय यावेळी तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “तुमची मुलगी केवळ तीन दिवसांची आहे ती डोके वर काढत रांगत आणि बोलत आहे.” सामंथाने तिच्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरेने लिहिलं आहे, “ती आधीच चालू शकते का?” तर दुसर्‍या एकाने लिहिले, “हे बाळ तुला घरी घेऊन जाणार आहे.” अशी मजेशीर कमेंट केली आहे.

दरम्यान, सामंथाने सांगितलं, “ती लवकर चालायला सुरुवात करेल यात शंका नाही. ती आता थोडी उभं राहण्याचा प्रयत्न करते. शिवाय तिने तिच्या पायावर खूप भार टाकला आहे. मात्र, आम्ही तिला उभे करण्याचा प्रयत्न करत नाही. तसेच ती एकटी उभी नाही राहत नाही पण तीला थोडा आधार देताच ती उभी राहते, शिवाय ती सतत उभं राहण्याचाही प्रयत्न करत असते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the third day the child began to crawl mother was also surprised see the viral video jap
First published on: 02-06-2023 at 12:19 IST