ST viral video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे माहीत नाही. शाळा सुटल्यावर शाळकरी मुलं एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी जीवघेणी कसरत करताना दिसतात. असाच एक मुलगा एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी त्या बसची खिडकी तुटून मुलगा खाली कोसळला. त्यानिमित्ताने राज्यातील एसटी बसेसची दुरवस्थाही समोर आली आहे. दरम्यान, असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक तरुण एसटी बसमध्ये सीट पकडण्यासाठी खिडकीतून बसमध्ये जाताना खिडकीच त्याच्या हातात आली आहे. या घटनेचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगा नक्की चूक कुणाची? दुसऱ्या व्हिडीओतील तरुण खिडकीतून आत शिरण्याच्या नादात खिडकी तोडून खाली पडला. पण त्या खाली पडलेल्या तरुणासोबत बसच्या कंडक्टरने काय केले ते आता तुम्हीच पाहा. त्या बिचाऱ्याला त्याने ती तुटलेली खिडकी पुन्हा एकदा लावायला सांगितली. हा व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आहे? एस.टीची आणखी एक खिडकी तुटली या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या तरुणाने जागा अडवण्याच्या नादात बसची खिडकी तोडली आहे. या खिडकीची फ्रेम घेऊन तो खाली पडला. त्यानंतर बसच्या कंडक्टरने त्याला पकडले आणि खिडकीची फ्रेम उचलायला लावली आणि मग त्या तरुणाला घेऊन तो डेपोच्या कार्यालयात नेत होता. मात्र, एक वृद्ध महिला मधे पडून, त्या कंडक्टरला रोखण्याचा प्रयत्न करू लागली. दरम्यान, तो कंडक्टर इतका भडकला होता की, तो त्याला खिडकीची ती फ्रेम पुन्हा एकदा लावून दे, असे म्हणू लागला. कंडक्टरच्या या वागणुकीवर लोक भडकले असून, त्या व्यक्तीची चूक आहेच; पण अशा प्रकारे त्याला धक्का देणे योग्य नाही. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: समुद्राच्या मधोमध थांबलेल्या बोटीवर देवमाशाचा हल्ला; एका क्षणात बोट उलटवली, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का हा व्हिडीओ सोशल मीडियावर baba_mandhare_32532 नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले आहे, "काचच नाही राव त्या खिडकीला." आणखी एक युजर म्हणतो, "त्यांची काय चूक नाहीये. याला एसटी महामंडळ जबाबदार आहे. काम मजबूत नव्हते."