oneplus nord 6 price : सध्या मोबाईल हा काळाची गरज बनला आहे. 4G, 5G च्या या जगामध्ये लोकांना अपडेटेड राहण्यासाठी स्मार्टफोनची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी बघता, आपल्या देशात दर आठवड्याला नवनवीन कंपन्यांचे फोन लाँच होत असतात. तर, स्मार्टफोन खरेदीदारांसाठी वनप्लसने मंगळवारी (७ एप्रिल) भारतात वनप्लस नॉर्ड ६ (OnePlus Nord 6Nord 6) लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये Nord 6 साठी ९,००० mAh क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. सोबत 80W SUPERVOOC इन-बॉक्स चार्जर मिळणार आहे. ???हा फोन 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करतो. या फोनचे पाणी आणि धुळीपासून संरक्षण होऊ शकते. त्यामुळे या फोनला IP66, IP68, IP69 व IP69K रेटिंग्ज प्राप्त झाले आहे.
OnePlus Nord 6 मध्ये 6.78 इंचांचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165 Hz आहे. तसेच यात 1,800 nits चा ‘हाय ब्राईटनेस मोड’ (HBM) आणि 3,600 nits पर्यंतची ‘पीक ब्राईटनेस’ उपलब्ध आहे. त्याचबरोबर कॉल ऑफ ड्युटी मोबाईल आणि फ्री फायर गेम्ससाठी 165 FPS चा सपोर्ट देण्यात आला आहे. 4nm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB यूएफएस 4.1 स्टोरेज उपलब्ध असणार आहे. हा फोन सुरुवातीपासूनच (out of the box) Android 16 वर आधारित OxygenOS 16 वर काम करतो.

कॅमेरा आणि किंमत…
Nord 6 मध्ये ५० एमपीचा मेन कॅमेरा आणि त्यासोबतच ८ एमपीचा अल्ट्रा-वाईड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी त्यात ३२ एमपीचा फ्रंट लेन्स उपलब्ध आहे. वनप्लस नॉर्ड ६ ‘होलोग्राफिक क्विक सिल्व्हर’, ‘फ्रेश मिंट’ व ‘लो-रिफ्लेक्शन पिच ब्लॅक’ या रंगांमध्ये उपलब्ध असेल. त्याची विक्री ९ एप्रिलपासून वनप्लस आणि ॲमेझॉनवर सुरू होईल. OnePlus Nord 6 ८ GB आणि २५६ GB व्हेरिएंटची किंमत ३८ हजार ९९९ पासून सुरू होते; तर १२ GB/२५६ GB मॉडेलची किंमत ४१ हजार ९९९ रुपये आहे.
