एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral

ड्रायव्हर त्याच्या एसयूव्हीसह एका छोट्या रस्त्यावर यू-टर्न घेत आहे जिथे सरळ गाडी चालवणे खूप मोठी गोष्ट आहे.

skillful driving video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: Nitish Joshi Vlogs / Youtube)

नवीन गाडी शिकलेल्या ड्रायव्हरसाठी डोंगरावर कार चालवणे सोपे काम नाही. याशिवाय तुमचा कार ड्रायव्हिंगचा अनुभव शहरातील असला तरीही तुम्हाला डोंगरावर गाडी चालवताना त्रास होतो. अशा ठिकाणी खूप अनुभव असलेले ड्रायव्हर किंवा स्थानिक ड्रायव्हर्स आवश्यक असतात. अशाच ड्रायव्हिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

नक्की काय झालं?

यूट्यूबवर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ड्रायव्हर त्याच्या एसयूव्हीसह एका छोट्या रस्त्यावर यू-टर्न घेत आहे जिथे सरळ गाडी चालवणे खूप मोठी गोष्ट आहे. हा रस्ता एका बाजूला डोंगर आणि दुसरीकडे खूप खोल खड्डा अशा ठिकाणी आहे. एसयूव्हीचा पुढचा भाग डोंगराच्या दिशेने आणि मागचा भाग दरीच्या दिशेने आहे, तो वळवताना कारचे टायर जवळजवळ दरीच्या दिशेने हवेत दिसत आहेत.

(हे ही वाचा: लग्नात वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि…; पहा Viral Video)

(हे ही वाचा: Viral Video: पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर कोंबड्याचा भन्नाट डान्स!)

डोंगरावर गाडी चालवणे आहे कठीण

ही घटना जपानमधील असावे कारण या कारवर लिहिलेली अक्षरे ही मित्सुबिशीची कार असल्याचे दिसते, परंतु अद्यापपर्यंत याची ठोस माहिती मिळालेली नाही. हा पराक्रम करण्याआधी एखादा तज्ज्ञ ड्रायव्हर १० वेळा विचार करेल, त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. या १.२२ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये, तुम्हाला स्पष्टपणे समजेल की डोंगरावर कार चालवणे किती कठीण आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One side mountain other side chasm drivers u turn video viral ttg

Next Story
मुस्लीम जोडप्यांमध्ये वाढतोय ‘Unboxing By Husband’ चा ट्रेंड; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
फोटो गॅलरी