Viral Divorce Letter : लग्न हे सर्वांत पवित्र नातं मानलं जातं. लग्न झाल्यानंतर काही दिवस सुखात, आनंदात जातात; पण त्यानंतर वैचारिक मतभेद सुरू होतात. अनेक छोट्या- छोट्या गोष्टी, सवयींवरून खटके उडू लागतात. अशा वेळी संसार टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वादविवादानंतर प्रकरण घटस्फोटानंतर जातं. अनेकदा घटस्फोटामागे घरगुती हिंसाचार, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वाद, विवाहबाह्य संबंध असतात. मात्र, सध्या घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे, ज्यात घटस्फोटामागचं कारण ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल.

पतीच्या विचित्र सवयींना कंटाळून पत्नीनं थेट घटस्फोटाचं पत्र लिहिलं आहे, जे आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. या पत्रात पत्नीनं पतीच्या अशा विचित्र सवयी लिहिल्या आहेत, ज्या वाचून तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल. दरम्यान, यातील कारणं अशी आहेत की, जी वाचून तुम्हीही विचारात पडाल.

घटस्फोटातील पत्रात पत्नीनं लिहिलंय की, डियर अंकित, डियर, तू तर घटस्फोट देत नाहीस; पण मी तुला कंटाळली आहे. आता आणखी सहन करू शकत नाही. मी या लग्नात सर्व्हाइव्ह करू शकत नाही, तू अंघोळ करीत नाहीस, तीन दिवस एकच अंडरवेअर परिधान करतोस. ज्या दिवशी चुकून अंघोळ करतोस, त्या दिवशी टॉवेल बेडवरच टाकून देतोस. तुला पैशांची अजिबात किंमत नाही, तू ८० हजारांचा नथिंग मोबाईल घेतलास, त्याचं नावचं नथिंग, तो काय फीचर्स देणार. तुझ्याकडून तर फ्लशही होत नाही, गोबरबुद्धी! माझे वकील तुला घटस्फोटाची कागदपत्रं पाठवतील, गुड बाय…!

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या घटस्फोटाची कागदपत्रं व्हायरल होत आहेत. जी वाचून युजर्सही आश्चर्यचकित होऊन प्रतिक्रिया देत आहेत. युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. दरम्यान, काही युजर्स पत्नीच्या हस्ताक्षराचंही कौतुक करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “हस्ताक्षर खूप चांगले आहे. ती नक्कीच वर्गात टॉपर होईल.” दुसऱ्या युजरने लिहिले, “मी इतके लक्षपूर्वक वाचत होतो, तिने काय बकवास लिहिले आहे.” तिसऱ्या युजरने म्हटले, “भाऊ, आंघोळ करा… तुम्ही आंघोळ का करत नाही? आता तुमची बायको गेली आहे.” चौथ्या युजरने म्हटले, “जाहिरातीची कल्पना खूप चांगली आहे.”