scorecardresearch

Premium

“ओंकार भोजनेला भेटायला गेले पण माझा चेहरा..”, कोकण हार्टेड गर्लने शेवटी ‘त्या’ फोटोचं गुपित केलं उघड

Influencerchya Jagat Video: अंकिता म्हणाली की, “कोकणात ओंकार भोजनेचे प्रयोग असताना तो एकदा म्हणाला होता की आपण भेटूयात पण अर्थात तो ‘ओंकार भोजने’ असल्याने…

Onkar Bhojane Ankita Walawalkar Blushing Photo Finally Kokanhearted Girl Revels Big Secret Speaks about Wedding plan Video
लोकसत्ताच्या इन्फ्लूएंसरच्या जगात या मुलाखतीत अंकिताने या फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kokanhearted Girl Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा स्टार ओंकार भोजने याने एका कार्यक्रमात कोकणहार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर हिचा चाहता असल्याची कबुली दिली होती. यानंतर या दोघांच्या अफेअरबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अंकिताने सुद्धा यावर तेव्हा उत्तर देत आम्ही दोघे चांगले मित्र आहोत असे सांगितले होते पण या स्पष्टीकरणानंतर तिने केलेल्या एका पोस्टमुळे चाहते पुन्हा त्यांची जोडी जुळवू लागले होते. अंकिताने पोस्टमध्ये ओंकारच्या बाजूला उभं राहून पोज दिली होती यावेळी तिने चेहरा हाताने झाकला होता. एकतर लाजण्याची पोज आणि त्यावर तिने लिहिलेलं कॅप्शन यामुळे चाहत्यांना ओंकार व अंकिताच्या जोडीविषयी पुन्हा प्रश्न पडू लागले. पण आता अलीकडेच लोकसत्ताच्या इन्फ्लूएंसरच्या जगात या मुलाखतीत अंकिताने या फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे.

अंकिता म्हणाली की, “कोकणात ओंकार भोजनेचे प्रयोग असताना तो एकदा म्हणाला होता की आपण भेटूयात पण अर्थात तो ‘ओंकार भोजने’ असल्याने त्याला नाटकाच्या प्रयोगानंतर कुणीतरी जेवायला घेऊन गेलं आणि त्यात त्याला भेटायला येण्यासाठी उशीर झाला. मी तेव्हा त्याची वाट बघत असताना माझा चेहरा धूळ,माती, उन्हाने खराब झाला होता. म्हणून मी त्या फोटोमध्ये हात चेहऱ्यावर ठेवला होता. आता हे खरं कारण असलं तरी गंमत म्हणून मीच “त्यानंतर ते दोघे भेटले” असं कॅप्शन दिलं होतं. त्या फोटोवरून पण नंतर ज्या चर्चा झाल्या त्या आम्ही एन्जॉय केल्या.”

Belt or dress Netizens laughed at the strange dress Said it it Urfi Javed Dress
बेल्ट आहे की ड्रेस? विचित्र ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ”उर्फी जावेद…”
cute video goes viral ganeshotsav
“तुला लाडू आवडतो?” चिमुकलीने थेट बाप्पाला विचारला प्रश्न; पाहा गोंडस व्हिडीओ
social media influencer konkan hearted girl Ankita Walawalkar
“मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे”, कोकण हार्टेड गर्ल स्पष्टच बोलली; म्हणाली…
shashank ketkar and priyanka dhavale
“Happy Birthday बायको”, शशांक केतकरची पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणाला, “तू असल्याने जगण्याला…”

Video: अंकिताचा लग्नाचा प्लॅन व फॅमिलीच्या गप्पा

दरम्यान, अंकिता वालावलकरने म्हणजेच तुमच्या लाडक्या कोकणहार्टेडगर्लने तिच्या कामाविषयी, प्रेमाविषयी व भविष्यातील प्लॅनविषयी सुद्धा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. अंकिताच्या कुटुंबाने सुद्धा या मुलाखतीत पहिल्यांदाच कॅमेरासमोर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ही सगळी धम्माल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Onkar bhojane ankita walawalkar blushing photo finally kokanhearted girl revels big secret speaks about wedding plan video svs

First published on: 04-10-2023 at 12:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×