Optical Illusion Challenge Find the Hidden Lipstick in This Image: आपल्यासोबत अनेकदा असं होतं, आपण एखाद्या गोष्टीकडे नीट पाहतो, पण तरीही काहीतरी वेगळंच दिसतं. कधी फोटोमध्ये असलेली गोष्ट दिसत नाही, तर कधी नसलेली गोष्ट दिसते. यालाच ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात, म्हणजेच डोळ्यांसमोर निर्माण होणारा एक प्रकारचा भ्रम. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात, जे आपल्या निरीक्षणशक्तीची खरी परीक्षा घेतात. लोक एकमेकांना हे फोटो शेअर करून “हे शोधून दाखव” असं चॅलेंज देतात आणि याच खेळात एक वेगळीच मजा दडलेली असते.

असाच एक भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. पहिल्या नजरेत हा फोटो अगदी साधा वाटतो. एक सुंदर पिवळसर रंगाची किचन एरिया, निळ्या रंगाचे काउंटर, शेल्फवर ठेवलेली भांडी, फळं आणि रोजच्या वापरातील वस्तू; सगळं काही अगदी नॉर्मल… पण इथेच आहे ट्विस्ट!

या फोटोमध्ये कुठेतरी एक लिपस्टिक लपलेली आहे, तीही अगदी डोळ्यांसमोर! पण, ती इतकी चतुराईने लपवलेली आहे की बहुतेक लोकांना ती शोधणं अवघड जातं. ती तुम्हाला शोधायची आहे.

चॅलेंज आहे फक्त ११ सेकंदांचं!

होय, तुम्ही हे कोडं ११ सेकंदांत सोडवू शकता का? सांगितलं जातं की, फक्त १% लोकांनाच दिलेल्या वेळेत ही लिपस्टिक सापडते. बाकी सगळे कितीही वेळ पाहिलं तरी गोंधळून जातात.

काही जण तर बराच वेळ फोटो निरखून पाहतात, प्रत्येक कोपरा तपासतात… पण तरीही उत्तर सापडत नाही. तुमच्यासोबतही असं होतंय का? मग एकदा शांतपणे, बारकाईने पुन्हा फोटो बघा.

सूचना (Hint) :

लिपस्टिक कुठेही लपलेली नाही, ती तुमच्या नजरेसमोरच आहे. फक्त तुम्ही योग्य ठिकाणी पाहत नाही आहात!

उत्तर पाहायचंय? थांबा… अजून एकदा प्रयत्न करा!

जर अजूनही सापडत नसेल तर आता उत्तर जाणून घ्या
फोटोच्या मध्यभागी, सीरिअल बॉक्सजवळ नीट पाहा. तिथे एका बाऊलमध्ये दूध आहे… आणि त्याच बाऊलमध्ये लिपस्टिक लपलेली आहे!

होय, इतकी साधी जागा… पण डोळ्यांना सहज दिसत नाही, म्हणूनच हे कोडं इतकं कठीण वाटतं.

येथे पाहा लिपस्टिक

शेवटी एक मजेशीर गोष्ट…

अशा ऑप्टिकल इल्यूजनमुळे आपली निरीक्षणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मेंदूची प्रतिक्रिया तपासली जाते, त्यामुळे असे फोटो फक्त मनोरंजनच नाही तर मेंदूसाठी एक छोटीशी कसरतही ठरतात.

मग काय… तुम्हाला ११ सेकंदांत लिपस्टिक सापडली का?