Find Baby Mother illusion: आजच्या धावपळीच्या जगात लोकांची एकाग्रता कमी होत चालली आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. अशा वेळी ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच नजरेला भ्रमित करणाऱ्या कोड्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ही कोडी केवळ वेळ घालवण्यासाठी नाहीत, तर तुमची निरीक्षण क्षमता आणि मेंदूची चपळता तपासण्याचा एक मजेदार मार्ग ठरतात. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक भन्नाट आणि सस्पेन्सनी भरलेलं कोडं घेऊन आलो आहोत, जे पाहून अनेक जण गोंधळून गेले आहेत.
चित्रात लपलेलं रहस्य तुम्हाला दिसतेय का बाळाची आई?
या खास चित्रात तुम्हाला एक बाळ दिसत आहे. बाळाच्या हातात दुधाची बाटली आहे आणि ते जणू भुकेले आहे, अशा प्रकारे ते आजूबाजूला पाहताना दिसते; पण खरा ट्विस्ट इथेच आहे आणि तो म्हणजे या चित्रात बाळाची आई लपलेली आहे.
तुमच्यासाठी चॅलेंज आहे
फक्त ११ सेकंदांत बाळाची आई शोधून दाखवा!
पहिल्यांदा पाहिल्यावर हे अगदी साधं चित्र वाटेल; पण जसं जसं तुम्ही बारकाईनं पाहाल, तसं तसं तुम्हाला गोंधळायला होईल. अनेकांनी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही मोजक्याच लोकांना याचं उत्तर सापडलं आहे.

तुमची नजर किती तीक्ष्ण?
असं म्हणतात की, ज्या लोकांची निरीक्षण क्षमता जास्त असते आणि जे प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहतात, तेच अशा प्रकारची कोडी पटकन सोडवू शकतात.
या चित्रात बाळाच्या डाव्या हातात दुधाची बाटली आहे, तसेच त्यानं काहीसं स्कार्फसारखं परिधान केल्यासारखं दिसतं. पण, खरी गंमत इथे नाही…
आई नेमकी कुठे आहे, हे शोधणं हेच खरं आव्हान आहे…
अजूनही उत्तर सापडलं नाही? मग हा छोटा हिंट बघा…
जर तुम्हाला अजूनही बाळाची आई सापडत नसेल, तर एक छोटी हिंट –
चित्र थोडं उजवीकडे फिरवून (rotate) पाहा!
होय! चित्राचा अँगल बदलताच अचानक तुम्हाला एक वेगळंच चित्र दिसू लागेल आणि त्यातच लपलेली आहे बाळाची आई!
उत्तर समजलं का?
चित्र उजवीकडे फिरवल्यानंतर आईचा चेहऱ्याचा आकार (face contour) स्पष्ट दिसतो. एकदा का तुम्ही तो पाहिला की, तुम्हाला वाटेल – “अरे! हे इतकं सोपं होतं?”
पाहा फोटो

शेवटी एक चॅलेंज!
आता तुम्ही हे कोडं सोडवलं असेल, तर तुमच्या मित्रांनाही हे चॅलेंज द्या.
पाहूया, तुमच्यासारखी तीक्ष्ण नजर त्यांच्याकडे आहे का?
लक्षात ठेवा…
अशा ऑप्टिकल इल्यूजनमुळे केवळ मजा येत नाही, तर तुमची एकाग्रता, निरीक्षण शक्ती आणि विचार करण्याची क्षमतादेखील वाढते.
