Hidden Parrot Challenge: सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट Optical Illusion फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेक जण गोंधळून गेले आहेत. कारण दिसायला साध्या वाटणाऱ्या या फोटोमध्ये एक मोठं रहस्य लपलं आहे. फोटोमध्ये फक्त आंब्यांचा मोठा ढीग दिसतो, पण त्याच आंब्यांमध्ये एक पोपट इतक्या हुशारीने लपला आहे की, अनेकांना तो शोधूनही सापडत नाही.

आजकाल इंटरनेटवर अशा प्रकारच्या Optical Illusion आणि Brain Teaser फोटोची मोठी क्रेझ पाहायला मिळते. काही फोटो मेंदूला गोंधळात टाकतात, तर काही तुमच्या डोळ्यांची खरी परीक्षा घेतात. हे फोटो पाहताना सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटतं. पण, बारकाईने पाहिल्यावर त्यामध्ये लपलेली गोष्ट लक्षात येते आणि मग लोक आश्चर्यचकित होतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे अनेक आंबे दिसत आहेत. पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर फक्त आंब्यांचाच ढीग दिसतो. मात्र, या आंब्यांच्या गर्दीत एक पोपट शांतपणे बसलेला आहे. विशेष म्हणजे, त्या पोपटाचा रंग आणि आजूबाजूच्या आंब्यांचा रंग जवळपास सारखाच असल्यामुळे तो लगेच नजरेत येत नाही.

हीच या Optical Illusion ची खरी गंमत आहे. कारण पोपट अगदी समोर असूनही अनेक लोक त्याला शोधू शकत नाहीत. काही जण फोटो पुन्हा पुन्हा झूम करून पाहत आहेत, तर काही लोक मित्रांना हा फोटो पाठवून आव्हान देत आहेत. अनेकांनी हा पोपट शोधण्यासाठी बराच वेळ घालवल्याचं सांगितलं आहे.

विशेष म्हणजे, या फोटोमध्ये दिसणारे आंबे हे सिंधुरा जातीचे असल्याचं सांगितलं जात आहे. ही आंब्याची एक खास जात असून, तिचा रंग पोपटाच्या रंगासारखाच दिसतो, त्यामुळे पोपट आंब्यांमध्ये इतका मिसळून गेला आहे की तो सहज ओळखू येत नाही.

सोशल मीडियावर अनेकांनी या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक म्हणत आहेत की, पोपट शोधताना त्यांचे डोळेच थकले; तर काहींनी हा फोटो डोळ्यांची आणि मेंदूची खरी परीक्षा असल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर हा फोटो पाहून आपण खूपच गोंधळलो असल्याचं सांगितलं.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे Optical Illusion फोटो आणि Brain Teaser कोडी मेंदू अधिक सक्रिय ठेवण्यास मदत करतात. निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी असे फोटो उपयुक्त ठरतात, त्यामुळे अनेक लोक हे फोटो केवळ मनोरंजन म्हणून नाही तर मेंदूचा व्यायाम म्हणूनही पाहतात.

आता तुम्हालाही हे आव्हान स्वीकारायचं असेल तर फोटो नीट पाहा. प्रत्येक कोपऱ्याकडे बारकाईने लक्ष द्या. कदाचित पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला पोपट दिसेल. पण, जर अजूनही सापडला नसेल तर काळजी करू नका कारण हा Optical Illusion इतका अवघड आहे की चांगल्या चांगल्या लोकांचीही नजर फसत आहे.

मग सांगा, तुम्हाला आंब्यांमध्ये लपलेला पोपट दिसला का?

जर नाही सापडला, तरी हरकत नाही. कारण -हे कोडेच असे आहे की, अनुभवी लोकदेखील ते सोडविताना गोंधळून जातात.

आता रहस्य उलगडण्याची वेळ आली आहे. पोपट लपलाय तो आंब्यांच्या ढिगाऱ्याच्या डाव्या वरच्या कोपऱ्यात.

येथे पाहा पोपट

कसंय? डोळ्यांसमोर असूनही दिसला नाही ना? म्हणूनच ऑप्टिकल इल्युजन इतके थरारक आणि रोचक वाटते. अशी भन्नाट कोडी रोज सोडवीत राहिलात, तर तुमची नजर आणि मेंदू दोन्ही धारदार होतील. पुढच्या वेळेस कदाचित तुम्हीच वेळ संपण्याच्या आत लपलेलं रहस्य शोधाल.