Optical Illusion Viral Photo: सोशल मीडिया जिथं व्हिडीओ, फोटोसह गेम, पझल्सही व्हायरल होत असतात. काही फोटो असे असतात ज्यामध्ये बरंच काही दडलेलं असतं आणि ते शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं. असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सगळीकडे गायी दिसत आहेत. पण यात एक कुत्रा देखील लपलेला आहे. कुत्रा शोधण्याचं आव्हान देत हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. त्यामुळे हा फोटो पाहणारा प्रत्येक जण यातील कुत्रा शोधत आहे. ऑप्टिकल इल्युजन असं या फोटोला म्हणतात. ही तुमचीही परिक्षा आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या हुशारीला चालना देत कुत्रा शोधायचा आहे. थोडी शोधा शोध केली की तुम्हाला हा चेहरा सापडेल. पण एक अट आहे. ती अशी की, १० सेकंदात तुम्हाला कुत्रा शोधायचा आहे.

‘तमा’ या कृषी कंपनीने हे कोडे तयार केले आहे. जर तुमची नजर गरुडापेक्षा तीक्ष्ण नसेल तर गायींमध्ये लपलेला कुत्रा शोधणे फार कठीण आहे. या फोटोमध्ये गायींमध्ये लपलेला कुत्रा शोधणं ही गंमत नाही तर मेंदूसाठी एक चालना मिळेल. ज्यांचा मेंदू एका जिनीयससारखा चालत असेल तेच या फोटोमध्ये कुत्रा शोधू शकतील. पण त्यासाठी आधी गाय आणि कुत्र्याच्या चेहऱ्यामध्ये काय फरक आहे हे समजून घ्यावं लागेल. चित्रात दिसणार्‍या अनेक गायींमध्ये लपलेला कुत्राही तसाच दिसत आहे. फरक एवढाच आहे की कुत्र्याचा चेहरा पाहून गायीमध्ये किती फरक आहे हे समजावे लागते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

काही लोक तर या फोटोत कुत्रा शोधून शोधून वैतागले. कारण त्यांना यात सगळ्याच प्राण्यांचे चेहरे एकसारखे दिसून येत आहेत. द सन आणि मेल ऑनलाइन सारख्या वेबसाईट्सनी देखील हा फोटो शेअर करून त्यांच्या दर्शकांना चॅलेंज दिले आहे. तुम्ही सुद्धा हा प्रयत्न केलाय का? खूप वेळ शोधूनही यात कुत्रा कुठे दिसला नाही? मग यात आम्ही तुमची मदत करतो. यात कुत्रा गायींच्या अगदी मध्यभागी लपलेला आहे. तुम्हाला फोटोच्या चौथ्या ओळीत पहावे लागेल. एक गाय आणि कुत्रा काळ्या आणि पांढर्‍या रंगात आहेत आणि दोघेही उजवीकडे तोंड करून आहेत.

आणखी वाचा : VIRAL: बाईकवर बसून लॅपटॉपवर काम करत होता, लोकांनी विचारले, “ऑफिसचे काम महत्त्वाचे आहे की जीव?”

अशा ब्रेन टीझर फोटोसह वेळ घालवणे हे तुमच्या मेंदूसाठी एक व्यायाम आहे. आजकाल सोशल मीडियावर अशा प्रकारची कोडी असलेले अनेक फोटो व्हायरल होत आहेत. नेटीझन्सनाही हे कोडी सोडवायला आवडतात हे दिसून येत. कुत्रा लपलेला फोटो तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवून बघा. ते हे कोडं सोडवू शकतात का बघा.