आजवर तुम्ही ऑप्टिकल इल्युजन असणारी अनेक कोडी सोडवली असतील. काही ऑप्टिकल इल्युजन तुमच्या व्यक्तित्वाबद्दल खुलासा करतात, तर काही तुमच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेतात. लोकांनाही ही कोडी सोडवायला अतिशय आवडतात. म्हणूनच ऑप्टिकल इल्युजनचे फोटो लगेचच व्हायरल होतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही फोटोंमधील कोडी सोडवणं अतिशय कठीण असतं. व्हायरल झालेला हा फोटोही याच पठडीतला आहे. या फोटोमध्ये आपल्याला एका खोलीमध्ये खूप सामान पसरलेले दिसेल. या सामनामधून आपल्याला एक मेणबत्ती शोधून काढायची आहे. मात्र फोटोमधील गुंतागुंतीमुळे तुम्हाला ही मेणबत्ती शोधणं कठीण जाणार आहे.

नेटकऱ्यांना अवघ्या १० सेकंदांमध्ये या पसाऱ्यामधून एक मेणबत्ती शोधून काढायची आहे. यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये १० सेकंदाचं टायमर लावा. ९९% लोक हे चॅलेंज पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत. तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या १% लोकांपकी आहात का? जर खूप प्रयत्न करूनही तुम्हाला मेणबत्ती सापडली नसेल तर काही हरकत नाही. खाली या कोड्याचे उत्तर दिलेले आहे.

Optical Illusion: मांजर की उंदीर? या चित्रात तुम्ही सर्वप्रथम काय पाहिलं यावर ठरेल तुमचं व्यक्तिमत्त्व

(Photo : Social Media)

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जर तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी झालात, तर अभिनंदन, तुमची बुद्धी आणि डोळे खूप तीक्ष्ण आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion in just 10 seconds the genius will find the candle hidden in this picture 99 percentage of people fail pvp
First published on: 27-09-2022 at 14:55 IST