Ms dhoni viral photo: महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. धोनीला फक्त खेळताना त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक अगदी काहीही करण्यासाठी तयार होतात. धोनीचे चाहते त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. महेंद्र सिंग धोनीचा फॅन बेस सर्वांना माहित आहे. त्याची झलक आयपीएलच्या फायनलमध्ये दिसून आली होती. तीन दिवस चालेल्या फायनलमध्ये सीएसकेच्या चाहत्यांनी पाऊस, वाऱ्याची पर्वा न करत स्टेडिअममध्ये सपोर्ट करत होते. त्यामुळे माही बाहरे कुठे दिसला तर त्याला पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी चाहते गर्दी करतात.
दरम्यान त्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. खरं तर, या फोटोमध्ये २ कासव दिसत आहेत. पण या कासवांमध्ये धोनीचा चेहरा लपला आहे. जर तुम्ही खरोखरच धोनी फॅन असाल तर तुम्हाला तो चेहरा नक्की दिसेल. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पाहा.
‘ऑप्टिकल इल्युजन’
‘ऑप्टिकल इल्युजन’ हा आता अगदी सामान्य शब्द झाला आहे. जे लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणजे नेमकं काय हे माहीत असतं. आणि त्यांना सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक चित्रदेखील पाहायला मिळतात. वास्तविक पाहता, ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. आपण जे पाहतो ते प्रत्यक्षात नसतं आणि जे घडतं ते सहजासहजी दिसत नाही.
हा फोटो देखील त्याच धाटणीचा आहे. या फोटोमध्ये तुम्ही २ कासव पाहू शकता. पण हे कासव अशा पद्धतीनं बसले आहेत की त्यांच्यात आपल्याला धोनीचा चेहरा दिसू शकतो. पण हा चेहरा पाहण्यासाठी तुम्हाला आपले डोळे किमान ७५ टक्के बंद करावे लागतील. आणि हा फोटो डाविकडून थोडा तिरपा करून पाहावा लागेल. चला तर मग तुम्ही सुद्धा ट्राय करून पाहा, तुम्हाला या फोटोमध्ये धोनी दिसेल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: लालबागच्या गर्दीत अडकला “आयुष्मान खुराना”; राजाच्या दरबारात प्रवेश करताच झालेला प्रकार कॅमेरात कैद
हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खऱ्या धोनी फॅनलाच हा फोटो दिसेल अशा कमेंट नेटकरी करत आहेत.