Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूनजचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन खूप सोपी असतात तर काही ऑप्टिकल इल्यूजन खूप कठीण असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन इतके थक्क करणारे असतात की अनेकदा सोडविणे सु्द्धा अशक्य असते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका वर्तुळ दाखवला आहे आणि या वर्तूळामध्ये एक आकडा लपलेला आहे. आपल्याला तो आकडा शोधायचा आहे. तुम्हाला कोणता आकडा दिसतोय?
व्हायरल फोटो
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला लाल रंगाचे वर्तूळ दिसेल. या वर्तुळात एक आकडा लपलेला आहे. आपल्याला तो आकडा शोधायचा आहे. वर्तुळाच्यावर लिहिलेय, “डोळ्यांची चाचणी” या फोटोच्या कॅप्शनमध्ये विचारलेय, “तुम्हाला कोणता आकडा दिसतोय?” या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी इंग्रजीमध्ये ३८ दिसत असल्याचे लिहिलेय. तर काही युजर्सनी इंग्रजीमध्ये ८८ दिसत असल्याचे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “मला मांजर दिसतेय” तर एका युजरने लिहिलेय, “जर तुम्हाला आकडा दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या स्क्रिनचा प्रकाश कमी करा.” हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्हाला या फोटोमध्ये कोणता आकडा दिसतोय?
हेही वाचा : पाकिस्तानी महिलेने वाहतूक पोलिसाच्या थेट अंगावर चढवली कार! धक्कादायक घटनेचा Video Viral
पाहा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो
तुम्हाला इंग्रजीमध्ये ३८ दिसताहेत का की ८८?
काही युजर्सनी इंग्रजीमध्ये ३८ तर काही युजर्सना इंग्रजीमध्ये ८८ दिसत आहे. तुम्हाला या वर्तुळात कोणता आकडा दिसत आहे? सुरुवातीला फोटोकडे लक्ष केंद्रीत करून पाहा. तुम्हाला कदाचिक ३८ हा आकडा दिसू शकतो. पण जेव्हा तुम्ही थोडा जोर देऊन पाहाल तर कदाचित तुम्हाला ८८ हा इंग्रजी आकडा दिसू शकतो. त्यासाठी तुम्हाला फोटो चारही बाजून फिरवून नीट पाहावा लागेल. काही लोकांना ३८ आकडा दिसेल तर काही लोकांना ८८ हा आकडा दिसू शकतो.