सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. काहींना एक माणूस बर्फात चालताना दिसेल तर काहींना कुत्रा धावत असताना दिसेल. संभ्रमात टाकणारा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला आधी काय दिसलं तपासा.

आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल

व्हायरल फोटो :

हा फोटो ‘Massimo’ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा फोटो म्हणजे एक प्रकारचे संभ्रमात टाकणारे ऑप्टिकल इल्युजन आहे. हा फोटो म्हणजे बिस्टेबल इल्युजनचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये डोळ्यांना असा भास होतो की दोन आपआपसात बदलणाऱ्या या गोष्टी आहेत.