Optical Illusion New Test About Personality: बघण्यासाठी नजर हवीच व समजण्यासाठी दृष्टी हवी असं म्हणतात. याचा अर्थ काय तर अनेकदा आपल्याला एखादी गोष्ट जितकी साधी दिसते तितकी ती आपल्या मनावर खोल परिणाम करणारी असते. आपले जुने अनुभव, समज, व्यक्तिमत्व व भविष्यातील आशा, अपेक्षा, स्वप्न या सगळ्याचा अंदाज आपण एखाद्या साध्या फोटोकडे कसे पाहता यावरून सुद्धा लक्षात येऊ शकतो. तुमची हीच दृष्टी समजून घेण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन सारखे खेळ महत्त्वाचे ठरतात. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा मुलाखतीच्या सत्रात या खेळांचा समावेश केला जातो. यावरून तुमचा दृष्टिकोन समोरच्या व्यक्तीला ओळखता येतो.

तुम्हाला असे आत्मपरीक्षण करायचे असेल तर आज आम्ही आपल्यासाठी एक ऑप्टिकल इल्युजनची चाचणी घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला प्रथमदर्शनी कोणते प्राणी दिसतात हे तुम्ही फोटो पाहून मनात ठेवायचे आहे. तुम्हाला दिसलेला प्राणी तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत काय सांगतो हे आपण लेखात सविस्तर पाहूया.

सर्वात आधी हा फोटो पाहा. यात तुम्हाला नेमका कोणता प्राणी जास्त ठळक दिसतोय हे मनात धरा.

Optical Illusion New Test About Personality
तुम्ही पाहिलेल्या प्राण्यावरून तुमचा दृष्टिकोन कसा आहे याचा अंदाज घेऊया (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आता आपण तुम्ही पाहिलेल्या प्राण्यावरून तुमचा दृष्टिकोन कसा आहे याचा अंदाज घेऊया.

जर तुम्हाला अनेक झेब्रा दिसले असतील, तर..

तुमचा स्वभाव विनोदी व प्रभावशाली आहे. तुम्ही एकत्र राहून काम करण्यावर अधिक विश्वास ठेवता, तुम्हाला गटाने पुढे जायला आवडते. तुम्ही नीरस व्यक्तींशी फार राहू शकत नाही किंबहुना त्यांच्याबरोबर असताना तुमची चिडचिड होऊ शकते. तुम्ही नेहमी नव्या अनुभवांच्या शोधात असता. तुमच्या स्वभावाला साजेसे गुण सुद्धा तुमच्या ठायी असतात. बोलण्यात तुम्ही तरबेज असू शकतात. चांगल्या बाबींसह या स्वभावाचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. जसे की, तुम्हाला एकटेपणा खायला उठतो. एकटे असताना तुम्हाला असुरक्षित वाटू शकते.

जर तुम्हाला सिंह दिसला तर याचा अर्थ असा होतो की…

तुमच्यासाठी स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा आहे. अनेकदा हा स्वाभिमान अहंकाराच्या टप्यातही पोहोचू शकतो. मात्र तुमचा दृढ निश्चय तुम्हाला इतरांपासून वेगळं ठरवतो. तुम्हाला एकटं पडण्याची चिंता नसते उलट ते तुमचे वैशिष्ट्य आहे असे तुम्हाला वाटू शकते. तुमच्याकडे नेतृत्वाचे गुण असतात, वर्चस्व गाजवणे तुम्हाला आवडते. स्वतंत्रता तुम्हाला भावते, आव्हाने तुम्हाला प्रोत्साहन देतात, तुमचे विजय तुम्हाला सर्वात प्रिय असतात. आपल्याला केवळ भावनिक गोष्टींकडे थोडे लक्ष द्यायला शिकले पाहिजे. सहकार व सहयोगाचे महत्त्व समजून घ्यायला हवे.

जर तुम्हाला सिंह व झेब्रा दोन्ही दिसत असतील तर…

तुम्ही सर्वोतपरी एक परफेक्ट लीडर आहात. तुम्ही मल्टिटास्किंग आहात व समस्या सोडवण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे विचार हे इतरांच्या पेक्षा नेहमी वेगळे ठरतात. एक समतोल साधणारं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही ओळखले जाता.

जर तुम्हाला चित्रात पक्षी दिसला असेल तर..

तुम्ही एक सूक्ष्मदर्शी बाबींकडे सुद्धा पूर्ण लक्ष देता हे सिद्ध होते. तपशील व परिपूर्णतेला तुम्ही प्राधान्य देता. हा नक्कीच एक उत्तम गुण असला तरी त्यामुळे अनेकदा चिडचिड होऊ शकते.

मग, तुम्हाला यापैकी नक्की कोणता प्राणी दिसला व तुमच्याविषयीचे अंदाज किती योग्य आहेत हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.