इंटरनेटवर अनेकदा वेगवेगळ्या भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. यापैकी एक नेहमी व्हायरल होणारा विषय म्हणजे ऑप्टीकल इल्यूजन अर्थात दृष्टीभ्रम निर्माण करणारे हटके फोटो. सध्या असाच एक फोटो इंटरनेटवर चर्चेत आहे आणि नेटकरी त्यामुळे संभ्रमात पडलेत.

अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो असं म्हणतात. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येतो. अनेकदा या ऑप्टीकल इल्यूजनमुळे (म्हणजेच दृष्टीचा होणार भ्रम) गोंधळ उडतो. सध्या इंटरनेटवर अशाच एका हाताच्या फोटोंची चर्चा होत असल्याचं दिसून येतंय. या व्हायरल फोटोमध्ये १० पैकी ९ वेळा पाहणाऱ्याचा मेंदू त्याला फोटोत किती हात आहेत याबद्दल विचार करताना तीन असं उत्तर देईल.

फोटोत काय आहे?
तसा हा फोटो काही महिन्यांपूर्वीचा असला तरी तो आता पुन्हा नव्याने चर्चेत आलाय. या फोटोमध्ये काही मित्रांनी हातामध्ये व्हिस्कीच्या छोट्या बाटल्या पकडल्या आहेत. हे सर्वजण चिअर्स करत आहेत. मात्र फोटोत दिसणारे हात हे नक्की कितीयत असा प्रश्न अनेकांना पडलाय. कारण फोटोमध्ये प्रथम दर्शनी केवळ तीन जणांचेच हात दिसत असून बाटल्या मात्र चार दिसत आहेत. अनेकजण हा फोटो पाहून गोंधळलेत. तुम्ही सुद्धा पाहा हा फोटो…

चौथा हात कुठे?
आता या फोटोमध्ये चौथा हात कुठेय असा प्रश्न अनेकांना पडलाय. कारण फोटोत बाटल्या तर चार स्पष्टपणे दिसत आहेत. पण चौथा हात नक्की आहे कुठे हे अनेकांना लक्षात येत नाहीय. गोंधळलेल्या या साऱ्यांना एकाने मदत व्हावी म्हणून फोटो क्रॉप करुन पोस्ट करत चौथा हात कुठेय हे दाखवलंय. आधी तुम्ही वरचा फोटो नीट पाहा आणि तुम्हाला चौथा हात दिसतोय का बघा… नाही दिसला? बरं चला आम्ही दाखवतो हा चौथा हात कुठेय…

काय म्हणताय अजूनही नाही कळलं. आहो, त्या चौथ्या व्यक्तीचा हात फोटोच्या डाव्या बाजूने फ्रेममध्ये येतोय, नीट बघा. त्या व्यक्तीने घातलेल्या फूल स्लीव्हच्या कोटमुळे हात बॅकग्राऊण्डसोबत कॅमोफ्लॅज झालाय. दिसतोय की नाही?

या फोटोमध्ये संभ्रम निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे या चौथ्या व्यक्तीने हातात घातलेले ग्लोव्हजचा रंग हा समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या जिन्सच्या रंगासारखा असल्याने अनेकांना तो ग्लोव्हज घातलेला हात हा समोरच्या व्यक्तीचा गुडघा वाटतोय. म्हणूनच पटकन् चौथ्या व्यक्तीचा हात फोटोत दिसून येत नाहीय.