scorecardresearch

Premium

Optical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई? एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…

एका झाडाच्या खोडावर एक पक्षी बसलेला फोटो व्हायरल होतोय. पण या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की , “हा पक्षी नव्हे, तुम्ही पुन्हा एकदा बघा.”

Optical Illusions bird or woman reddit photo Puzzle goes viral on social media
(Photo : Reddit)

Optical Illusions : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एक प्रकारची बुद्धिमता चाचणी होय. अनेक लोकांना ऑप्टिकल इल्युजन सोडविणं आवडतं तर काही लोकांना हे सोडविणं खूप अवघड जातं. अनेक जण तर बुद्धिमता वाढवण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन सोडवत असतात. सोशल मीडियावरही ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात.

सध्या अशीच एक ऑप्टिकल इल्युजनची पोस्ट व्हायरल होत आहे. Reddit या सोशल मीडियावरील ही पोस्ट आहे. फोटोमध्ये एका झाडाच्या खोडावर एक पक्षी बसलेला दिसतोय पण या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा पक्षी नव्हे, तुम्ही पुन्हा एकदा बघा.”

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

हेही वाचा : Youngest Weightlifter : OMG! आठ वर्षाची चिमुकली उचलते चक्क ६० किलोचं वजन, नेटकरी म्हणतात, “ही तर दुसरी मीराबाई चानू”

हा फोटो पाहून सुरुवातीला कुणालाही वाटेल की फोटोमध्ये झाडाच्या खोडावर पक्षी बसला आहे, मात्र नंतर जेव्हा तुम्ही चांगले निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला कळेल की झाडाच्या खोडावर पक्षी नाही तर महिला बसली आहे. जेव्हा तुम्ही खूप बारकाईने निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला लगेच महिला दिसून येते. एका आगळ्यावेगळ्या स्टाइलमध्ये ही महिला बसलेली दिसत आहे.

हेही वाचा : “लाइक आणि सबस्क्राइब” यूट्यूबद्वारे होणाऱ्या फसवणुकीची माहिती देण्यासाठी सरकारने शेअर केलेला Video पाहिलात का?

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स करताहेत आणि उत्तरे देत आहेत तर काही लोक ही पोस्ट शेअर करत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusions bird or woman reddit photo puzzle goes viral on social media ndj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×