Optical Illusions : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एक प्रकारची बुद्धिमता चाचणी होय. अनेक लोकांना ऑप्टिकल इल्युजन सोडविणं आवडतं तर काही लोकांना हे सोडविणं खूप अवघड जातं. अनेक जण तर बुद्धिमता वाढवण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन सोडवत असतात. सोशल मीडियावरही ऑप्टिकल इल्युजनच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात.
सध्या अशीच एक ऑप्टिकल इल्युजनची पोस्ट व्हायरल होत आहे. Reddit या सोशल मीडियावरील ही पोस्ट आहे. फोटोमध्ये एका झाडाच्या खोडावर एक पक्षी बसलेला दिसतोय पण या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा पक्षी नव्हे, तुम्ही पुन्हा एकदा बघा.”
हा फोटो पाहून सुरुवातीला कुणालाही वाटेल की फोटोमध्ये झाडाच्या खोडावर पक्षी बसला आहे, मात्र नंतर जेव्हा तुम्ही चांगले निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला कळेल की झाडाच्या खोडावर पक्षी नाही तर महिला बसली आहे. जेव्हा तुम्ही खूप बारकाईने निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला लगेच महिला दिसून येते. एका आगळ्यावेगळ्या स्टाइलमध्ये ही महिला बसलेली दिसत आहे.
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स करताहेत आणि उत्तरे देत आहेत तर काही लोक ही पोस्ट शेअर करत आहे.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusions bird or woman reddit photo puzzle goes viral on social media ndj