Teacher Caught Slapping Young Children : “आई-वडिलांनंतर मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम शिक्षक करतात,” असं म्हटलं जातं. कारण शिक्षक हे केवळ पुस्तकातील धडे शिकवणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे असतात. “गुरु हा ज्ञानाचा दीप असतो” ही म्हण शिक्षकांच्या महत्त्वाची जाणीव करून देते. मात्र, ज्या हातांनी मुलांना घडवायचं असतं, त्याच हातांनी जर भीती निर्माण केली तर शिक्षणाच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेच्या वर्गात एका शिक्षकाने विद्यार्थींना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर पालक आणि नेटकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतं? (What Happened in Viral Video)
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गातील लहान मुलींना रांगेत उभं करून एकामागोमाग एक कानाखाली मारताना दिसत आहे. यामध्ये काही लहान मुलींचाही समावेश असून. शिक्षकांनी इतक्या जोरात विद्यार्थिंना मारले की त्या रडत आहे.
लहान मुलींसाठी शाळा ही शिकण्याची आणि सुरक्षित वाटण्याची जागा असते. मात्र या घटनेमुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की, अशा वातावरणात मुलांच्या मनावर किती परिणाम होत असेल?
लपून केलेल्या रेकॉर्डिंगमुळे घटना समोर (Hidden Recording Reveals Incident)
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ वर्गाच्या दारामागून गुपचूप रेकॉर्ड करण्यात आला होता. या रेकॉर्डिंगमुळे शिक्षकाचे हे वर्तन समोर आले.
व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांनी म्हटलं की, ही मुलं इतकी लहान आहेत की त्यांना नेमकं काय घडत आहे हेही समजत नसावं. काही मुलं रडत असतानाही शिक्षक मारहाण करत असल्याचं दिसत असल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी असंही म्हटलं की, हा व्हिडीओ समोर आला नसता तर कदाचित ही घटना कधीच बाहेर आली नसती.
सोशल मीडियावर संताप, कारवाईची मागणी (Social Media Outrage)
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेक पालक आणि शिक्षकांनी या प्रकाराचा निषेध करत संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अनेकांनी सांगितलं की, शिस्त आणि मारहाण यात मोठा फरक आहे. मुलांना समजावून सांगणं, संयमाने शिकवणं आणि प्रेमाने मार्गदर्शन करणं गरजेचं आहे; भीती निर्माण करून शिक्षण देता येत नाही.
काही लोकांनी जुन्या काळातील शाळांमध्ये होणाऱ्या कठोर शिक्षेचा उल्लेख केला. मात्र आजच्या शिक्षणपद्धतीत मुलांच्या भावना, मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास यांना महत्त्व दिलं पाहिजे, असं अनेकांनी म्हटलं.
मुलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह (Questions Over Child Safety)
या घटनेनंतर शाळांमधील मुलांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. शाळांमध्ये शारीरिक शिक्षेला बंदी असतानाही अशा घटना का घडतात, असा सवाल अनेकांनी केला आहे.
बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या मारहाणीचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासावर आणि मानसिक विकासावर होऊ शकतो.
व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर फिरत असून, अनेक जण या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. मुलांना शिकवण्यासाठी शिस्त आवश्यक आहे, पण ती भीती आणि मारहाणीवर नाही तर विश्वास, आदर आणि काळजीवर आधारित असली पाहिजे.
