scorecardresearch

Premium

‘हीच खरी माणूसकी!’ तारेमध्ये अडकलं घुबड, ‘असा’ वाचवला त्याचा जीव! पाहा अंगावर काटा आणणार Video

कधी-कधी पशू-पक्षी अशा संकटात सापडतात की ते स्वतः काही करू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत त्यांना माणसांच्या मदतीची गरज भासते

owl was stuck in a branch struggling for life man rescues video
तारेमध्ये अडकलं घुबड, असा वाचविला जीव! पाहा अंगावर काटा येणारा Video ( photo – Twitter)

मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे नुकसान होत असते. त्याचबरोबर प्राण्यांचे देखील नुकसान होत असते. कधी-कधी पशू-पक्षी अशा संकटात सापडतात की ते स्वतः काही करू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत त्यांना माणसांच्या मदतीची गरज भासते आणि अर्थातच, जगात अजूनही काही चांगले लोक आहेत जे त्या प्राण्यांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. इंटरनेट हा अशा व्हिडिओंचा खजिना आहे आणि आज आमच्याकडे एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे जो पाहून तुमचे ह्रदय पिळवूटन जाईल.

तारेमध्ये अडकलेल्या घुबडाचा जीव

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून त्यात एक व्यक्ती घुबडाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बिचार्‍या पक्ष्याचा एक पंख तारेत अडकला होता आणि झाडाच्या फांदीला धोकादायकपणे लटकला होता. व्हिडिओमध्ये एक माणूस वाहत्या पाण्याच्या प्रवाहात जातो आणि झाडाला लटकलेल्या घुबडाजवळ पोहचतो.

हेही वाचा – पीके चॅलेंज घेणं बेतलं तरुणाच्या जीवावर! लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान मद्यपान करणाऱ्या आणखी एका इन्फ्लुएंसरने गमावला जीव

घाबरलेल्या घुबडाजवळ एका हाताने त्याला कापडाच्या जाळीमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या हाताने तारेपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एका दगडावर ठेवून त्याच्या पंखाला अडकलेल्या तारेने थोडी आग लावून जाळतो आणि नंतर तार कापून त्याला तारेपासून पूर्णपणे मुक्त करतो घुबड हे करताना धीराने वाट पाहत असतो. त्यानंतर तो व्यक्ती घुबडाला पुन्हा जंगलात सोडून देतो.

हेही वाचा – भारतातील सर्वात सुंदर गावांचे फोटो पाहिले का! आनंद महिंद्रांनी शेअर केली त्यांची Bucket list, तुम्हीदेखील देऊ शकता भेट

पोस्ट २.७ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. लोक त्या माणसाचे कौतूक केले आहे. अनेकांनी जंगल भागात घाण पसरवणे कसे टाळावे हे लिहिले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Owl was stuck in a branch struggling for life man rescues video snk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×