माणूस आणि प्राणी यांची मैत्री खूप जुनी मानली जाते. विशेषतः जर तो पाळीव प्राणी कुत्रा असेल मग तर त्याच्या मैत्रीचू उदाहरणं पाहण्यासारखे असते. कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र असल्याचे म्हटले जाते. आवश्यक असल्यास, तो मानवांसाठी आपला जीव धोक्यात घालण्यात मागे हटत नाही हे अनेकदा दिसून आले आहे. त्याच वेळी, मनुष्यसुद्धा त्याच्यासाठी सर्व काही करण्यास तयार असतो. असे सुंदर दृश्य मुंबईत पाहायला मिळाले.

सर्व सीट कुत्र्यासाठी बुक केल्या होत्या

अहवालानुसार, एका प्रवाशाने आपल्या पाळीव कुत्र्यासह प्रवास करण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाच्या सर्व बिझनेस क्लास सीट बुक केल्या. बुधवारी मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे बिझनेस क्लास बुक करण्यात आले. जेणेकरून ‘K9’ त्याच्या मालकासह हा अद्भुत प्रवास करेल.

१२ सीट्ससाठी २ लाख ५० हजार रुपये दिले

मिळालेल्या माहितीनुसार, एअरबस ए ३२० विमानात १२ बिझनेस क्लास सीट होत्या. पाळीव कुत्र्याच्या मालकाने या सर्व सीट बुक केल्या आहेत, जेणेकरून फक्त तो आणि त्याचा पाळीव कुत्रा विमानात आनंदाने प्रवास करू शकेल. मुंबई ते चेन्नई या दोन तासांच्या फ्लाइटसाठी बिझनेस क्लासच्या तिकिटाची सरासरी किंमत १८,००० ते २०,००० रुपये आहे. म्हणजेच त्या प्रवाशाने १२ सीटसाठी २ लाख ५० हजार रुपये दिले.

पाळीव प्राणी एअर इंडियामध्ये घेऊन जाऊ शकतात

हे लक्षात घेतले पाहिजे की सहसा पाळीव प्राण्यांना विमानात नेण्याची परवानगी नसते. तथापि, एअर इंडिया पाळीव प्राण्यांना काही अटींनुसार आपल्या फ्लाइटमध्ये प्रवास करण्याची परवानगी देते. यासाठी प्रवाशाकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते.