scorecardresearch

ट्रिपवरून परतलेल्या मालकाला पाहून कुत्र्याने मारली मिठी, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

कुत्र्यांना एकदा कोणी जीव लावला तर मरेपर्यंत ते कधीच त्या माणसाला विसरत नाहीत व इमानदारीने त्याच्यासोबत आयुष्य घालवतात. एकदा त्यांना माणसांचा लळा लागला तर त्यांना माणसापासून दूर राहणं अधिकच कठीण जातं. असाच एक कुत्रा आणि मालकाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय

Dog-Viral-Video
(Photo: Instagram/ magnusthetherapydog)

दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. इतकेच नव्हेतर काही लोक कुत्र्यांना आपली मुले मानतात. कुत्रा हा माणसापेक्षा जास्त इमानदार आणि मायाळू असतो. त्यांना एकदा कोणी जीव लावला तर मरेपर्यंत ते कधीच त्या माणसाला विसरत नाहीत व इमानदारीने त्याच्यासोबत आयुष्य घालवतात. एकदा त्यांना माणसांचा लळा लागला तर त्यांना माणसापासून दूर राहणं अधिकच कठीण जातं. असाच एक कुत्रा आणि मालकाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सहलीवरून घरी परतलेल्या मालकावर कुत्रा ज्या पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करतो, त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या कुत्र्याचे नाव मॅग्नस आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की कुत्र्याचा मालक घराचा दरवाजा उघडतो आणि घरात पाऊल ठेवतो, त्याला पाहताच मॅग्नस धावत मालकाकडे येतो आणि मालकाला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो.

आणखी वाचा : जीवाची पर्वा न करता या व्यक्तीने कोब्राला वाचवले, VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ मजेदार बनतो जेव्हा प्रेम दाखवणारा कुत्रा मालकाला जमिनीवर झोपवतो आणि त्याच्या मालकाचे तोंड प्रेमाने चाटू लागतो. कुत्रा आणि मालकाचा प्रेमळ आणि गोंडस व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर magnusthetherapydog नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि ११ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरीबाई…नवऱ्यासमोर कुण्या दुसऱ्यासोबतच करू लागली डान्स

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दुकानदारावर फिदा झालेल्या ग्राहकाने दिले ३८ हजारांचे बक्षीस

डॉगी लव्हर्सकडून या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे आणि ते त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबतही शेअर करत आहेत. क्यूट डॉगीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केलाय. एका युजरने म्हटले की “कुत्रा हा पृथ्वीवरील सर्वोत्तम प्राणी आहे. कुत्र्यापेक्षा जास्त प्रेम कोणीही दाखवू शकत नाही”, तर दुसर्‍या युजरने लिहिलं, “निष्ठा काय असते हे कुत्र्याकडून शिकायलं हवं”. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Owner returns home from trip dog gave adorable reaction cute viral video won everyones heart prp