Pakistan Shoot Down a US Air Force F-35 Jet Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असलेला एक व्हिडीओ आढळून आला. या व्हिडीओसह असा दावा केला जात होता की, पाकिस्तान एअर फोर्सने चिनी JF-17 लढाऊ विमानाने अमेरिकेच्या हवाई दलाचे F-35A स्टेल्थ हे फायटर विमान न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाडले. पण, खरंच अशी कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर IDU ने हा व्हिडीओ खोट्या दाव्याने शेअर केला आहे.

इतर युजर्सही असाच व्हिडीओ समान दाव्याने शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

आम्हाला २९ मे २०२४ रोजी अपलोड केलेल्या अनेक बातम्यांमध्ये स्क्रीनग्रॅब आढळला.

https://www.ndtv.com/world-news/f-35-fighter-jet-worth-135-million-crashes-in-new-mexico-pilot-hospitalised-5769461
https://abcmedia.am/en/news/65781

या बातम्यांमध्ये म्हटले होते की, न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क येथे मंगळवारी F-35 लढाऊ विमान कोसळल्यानंतर एका पायलटला बाहेर काढण्यात आले, या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. सीबीएस न्यूजने अमेरिकन संरक्षण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हे विमान $135 दशलक्ष किमतीच्या जेटचे एक मॉडेल होते, जे अल्बुकर्कपासून ११०० किलोमीटरहून अधिक दूर असलेल्या दक्षिणी कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसकडे जात होते. स्थानिक आउटलेट KOB4 ने सांगितले की, किर्टलँड एअर फोर्स बेस येथे इंधन भरल्यानंतर दुपारी १.५० च्या सुमारास (स्थानिक वेळ) अपघात झाला.

आम्हाला स्टोरीफुलच्या यूट्यूब चॅनेलवर एक वर्षापूर्वी अपलोड केलेला व्हिडीओदेखील आढळला.

आम्हाला द टेलिग्राफवरही हा व्हिडीओ आढळला.

हा व्हिडीओ अनेक एक्स हँडलवरही अपलोड करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष : न्यू मेक्सिकोमध्ये F-35 लढाऊ विमान अपघाताचा २०२४ चा व्हिडीओ, आता पाकिस्तान एअर फोर्सने चिनी JF-17 द्वारे अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याच्या खोट्या दाव्यांसह अलीकडील म्हणून शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.