scorecardresearch

“शाहरुख, तू भारत सोडून कुटुंबासहीत पाकिस्तानमध्ये स्थायिक हो! मोदी सरकार तुझ्या कुटुंबासोबत…”; पाकमधून ऑफर

पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रिटी आर्यन खान प्रकरणामध्ये शाहरुखचं समर्थन करत असतानाच शाहरुखला थेट भारत सोडून पाकिस्तान स्थायिक होण्याची ऑफर आलीय.

shahrukh khan family
आर्यन खान प्रकरणामध्ये शाहरुखला पाठिंबा वाढताना दिसत आहे. (फोटो ट्विटरवरुन साभार)

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अमली पदार्थविरोधी पथकाने २ ऑक्टोबरच्या रात्री ताब्यात घेतल्यापासून जामीन मिळालेला नाही. अनेकदा प्रयत्न करुनही शाहरुखच्या मुलाला जामीन देण्यात आलेला नाही. आर्यनला त्याच्या काही मित्रमैत्रिणींसोबत कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीतून ताब्यात घेण्यात आलेलं. आर्यन खान हा अमली पदार्थ खरेदी विक्रीच्या रॅकेटमध्येही असल्याचा आरोप एनसीबीने केलाय. २३ वर्षीय आर्यनच्या अटकेवरुन आता भारताचा शेजरी असणाऱ्या पाकिस्तानमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात. त्यातच एक प्रतिक्रिया सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे.

पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रिटी आर्यन खान प्रकरणामध्ये शाहरुखचं समर्थन करत आहेत. आता पाकिस्तानमधील एक लोकप्रिय वृत्तनिवेदक असणाऱ्या वकार जाकानेही ट्विटरवरुन शाहरुखचं समर्थन केलं आहे. इतक्यावरच न थांबता जाका यांनी शाहरुखला एक ऑफरही दिलीय.

शाहरुख खानच्या कुटुंबाला भारतामध्ये सत्तेत असणारा भाजपाच्या मोदी सरकारकडून चुकीची वागणूक दिली जात असल्याचा आरोप जाका यांनी केलाय. “शाहरुख खान सर, तुम्ही भारत सोडा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत पाकिस्तानमध्ये येऊन स्थायिक व्हा. नरेंद्र मोदी सरकार तुमच्या कुटुंबासोबत जे काही करत आहे ते फार चुकीचं आहे. माझं शाहरुखला समर्थन आहे,” असं जाका यांनी ट्विट केलं आहे.

अर्थात यावरुन जाका यांना अनेकांनी ट्रोलही केलं आहे. अनेकांनी त्यांना तुमच्या देशात काय सुरु आहे त्याकडे लक्ष द्या असा सल्ला दिलाय.

तुमचा स्वत:चा ठाव ठिकाणा नाही…

शाहरुखच्या पैशांनी तुमची भरभराट होईल

आमच्या घरी आहे एक एसआरके

पण हा एसकेआर कोण?

हे वाचून शाहरुख

ते ठिक आहे पण हा एसकेआर कोण?

अरे तो एसआरके आहे एसकेआर नाही

तू आधी शाळेत जा

शाहरुखला भारतामधूनही दिवसोंदिवस पाठिंबा वाढतानाचं चित्र दिसत आहे. अनेक कलाकारांनी उघडपणे शाहरुखला पाठिंबा दिल्याचं पहायला मिळालं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-10-2021 at 16:57 IST