पाकिस्तानातील एका महिला टिकटॉकरने आरोप केला आहे की स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच तिचे कपडे फाडले गेले आणि शेकडो लोकांनी तिच्यावर हल्ला केला, तिला फेकून दिले. लॉरी अड्डा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या पहिल्या माहिती अहवालात (एफआयआर) म्हटले आहे की, ती तिच्या सहा साथीदारांसह शनिवारी स्वातंत्र्यदिनी मीनार-ए-पाकिस्तानजवळ व्हिडीओ चित्रित करत होती जेव्हा सुमारे ३०० ते ४०० लोकांनी हल्ला केला.” Dawn या वृत्तपत्राने हे वृत्त दिले.

नक्की काय झालं?

तिने आणि तिच्या साथीदारांनी जमावापासून वाचण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. “गर्दी खूप मोठी होती आणि लोक आम्हाला बंदिस्त करत होते आणि आमच्या दिशेने येत होते. लोक मला ढकलत, खेचत होते आणि यातच त्यांनी माझे कपडे फाडले. अनेक लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला पण गर्दी खूप मोठी होती. त्या लोकांनी हवेत फेकून दिले. “ती म्हणाली.  तिच्या साथीदारांवरही हल्ला झाला असं तिने सागितलं.

अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

लाहोर पोलिसांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनी शहरातील ग्रेटर इक्बाल पार्क येथे महिला टिकटॉकर आणि तिच्या साथीदारांना मारहाण आणि चोरी केल्याप्रकरणी शेकडो अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तिची अंगठी आणि कानातले जबरदस्तीने घेतले, तिच्या एका साथीदाराचा मोबाईल फोन, त्याचे ओळखपत्र आणि १५,०० हिसकावले गेले, असे अहवालात म्हटले आहे. “अज्ञात व्यक्तींनी आमच्यावर हिंसक हल्ला केला,” तक्रारदाराने सांगितले. पोलिस अधीक्षक या घटनेतील संशयितांविरोधात “तात्काळ कायदेशीर कारवाई” करतील.

“ज्यांनी महिलांच्या सन्मानाचे उल्लंघन केले आणि त्यांना त्रास दिला त्यांना कायद्याच्या कक्षेत आणले जाईल”, असे पोलीस म्हणाले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यावर नागरिकांनी व्हिडीओमध्ये पुरुषांच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. टीक टॉक या लोकप्रिय चीनी लघु व्हिडीओ अॅपवर पाकिस्तानमध्ये अनेक वेळा बंदी घालण्यात आली आहे. हा अॅप अनेक देशात खूप प्रसिद्ध आहे.