Pakistani actress Hania Aamir gets water bottles Viral Video : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानसंबंधी अनेक मजेशीर मीम्स शेअर केल्या जात आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानला पाण्याची कमतरता भासू शकते अशा अर्थाच्या अनेक पोस्टचा समावेश आहे.

आता असाच एक भारतातील व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक भारतीय चाहता बाटलीबंद पाण्याचे एक पार्सल पाकिस्तानी अभिनेत्री आणि युट्यूबर हानिया आमिरला पाठवताना दिसत आहे. हानिया आमिर ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचे भारतात देखील मोठ्या प्रणाणात चाहते आहेत. तिचे युट्यूबवर दहा लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर १८ मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

दरम्यान व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका स्थानिक कुरिअर सर्व्हिसचा असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये या पार्सलच्या बॉक्सवरती ते हानिया आमिरसाठी असल्याचे लिहीलेले दिसत आहे. तसेच त्यावर रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तान असा पत्ता देखीललिहीलेला आहे. या बॉक्समध्ये पिण्याच्या पाण्याच्या डझनभर बाटल्या पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती हे पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीचा चेहराही या व्हिडीओमध्ये दाखवतो. याबरोबरच तो बॉक्सवर लिहीलेला पत्ता वाचून बॉक्समधील पाण्याच्या बाटल्या दाखवताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करार हा १९६० मध्ये करण्यात आला होता आणि १९६५, १९७१ आणि १९९९ अशी तीन युद्धे झाली तरी हा करार कायम ठेवण्यात आला होता. पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या झाल्यानंतर या हल्ल्याचे पाकिस्तानशी संबंध समोर आल्यानंतर भारताने सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादाचे कारण देत हा करार रद्द केला आहे. यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असताना सोशल मीडियावर मात्र अशा पद्धतीच्या मीम्स प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.