Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओंमध्ये रानटी प्राण्यांचे रौद्र रूपदेखील आपल्याला पाहायला मिळते; तर काही व्हिडीओंमध्ये आपल्या जीवाला धोका असणाऱ्या प्राण्यांसोबतच स्टंट करण्याचा प्रयत्न केला जातो, जो कधीकधी फसतो आणि त्यामुळे काही जणांना दुखापत होते तर काहींना जीवही गमवावा लागतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो.जंगालात भयानक शिकारी वाघ याचाही चांगलाच दरारा असतो. त्यामुळे वाघ आणि सिंह दोघेही खूप बलवान आणि हुशार प्राणी आहेत. त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानमधल्या एका तरुणानं थेट वाघाच्या जबड्यातच आपला हात घातला आहे. आणि हे कशासाठी तर फक्त आणि फक्त एका रीलसाठी, व्हिडीओ बनवण्यासाठी.

Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”

एवढ्या धोकादायक प्राण्याच्या तोंडात बिंधास्तपणे कुणी कसा आपला हात ठेऊ शकतं असं तुम्हालाही वाटेल. आजकालची तरुण पिढी काही तरी तुफानी करण्याच्या नादात स्वत:च्या जिवाचीदेखील पर्वा करत नाही आणि मग कधीकधी आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती वाघाच्या जबड्यात अगदी सहज न घाबरता आपला हात ठेवत आहे. त्याला असं वाटतं होतं की वाघ त्याला काही करणार नाही, मात्र तुम्ही व्हिडीओ नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल वाघ हिंसक होण्याच्या मार्गावर आहे. वाघाचा संयम कधीही संपू शकतो आणि वाघ या तरुणाच्या हाताला इजा करु शकतो. दरम्यान व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे की, या तरुणाने हे वेळीच ओळखलं आणि वाघाच्या जबड्यातून स्वत:चा हात काढला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

v

सोशल मीडियावर हा व्हिडीओ nouman.hassan1 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी या सगळ्यामध्ये त्या तरुणाला दोषी ठरवत “अरे शेवटी त्यांचाही जीव आहेच की”, “संयमाचा अंत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता तुम्हीच आम्हाला सांगा, यात नेमकी चूक कुणाची?

m

m

Story img Loader