Pakistani Funny Advertisement Video: सोशल मीडियाच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल याची कल्पनाही करता येत नाही. कधी कधी आपण अशा काही गोष्टी पाहतो की, ज्या आपल्या कल्पनेबाहेरच्या असतात. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ हे आपल्या देशातील असतात; तर काही व्हिडीओ इतर देशांतील असतात. आपल्या शेजारचा देश पाकिस्तानमधलेही काही व्हिडीओ सध्या आपल्या देशात चर्चेत आहेत. आपण जगाच्या एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या माणसांच्या जीवनाविषयी जाणून घेऊ शकतो. लोक त्यांची क्रिएटिव्हिटी काही मिनिटांत जगासोबत शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यामध्ये लोक आपापल्या नवीन कलाकृती दाखवीत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात; तर काही व्हिडीओंमधून आपल्याला नवनवीन टेक्निक समजतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे; जो पाहून तुम्हीही हसून हसून थकून जाल. नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडीओही पाकिस्तानचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमधील लोक वजन कमी करण्यासाठी एक अनोखी युक्ती सांगत आहेत. त्यांचा व्यायाम पाहून तुम्हालाही हसू फुटेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहेत. यादरम्यान काही मशिन्सचाही वापर केला जात आहे. खरे तर हा व्हिडीओ चरबी कमी करणाऱ्या मशीनच्या जाहिरातीचा आहे, जो ऐकून तुम्हाला हसू येईल. त्यामध्ये दिसणारी व्यक्ती सांगत आहे की, जर तुम्ही हे मशीन खरेदी केले, तर तुमचे वजन नक्कीच कमी होईल. (हे ही वाचा : रेल्वेमध्ये प्रवासी अन् टीसीमध्ये रंगला वाद, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “सुप्रीम कोर्टाचा आदेश…” नेमकं काय घडलं पाहा ) व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तीन लोक दिसत आहेत. दोन लोक मागे मशीनचा वापर करून व्यायाम करताना दिसत आहेत. तर पुढे असणारी व्यक्ती मशीनवर व्यायाम करताना आणि त्या मशीनच्या वापर केल्याने तुमचे वजन झटक्यात कमी होईल, असे सांगताना दिसत आहे. त्याची ती माहिती सांगण्याची कला पाहून तुम्हाला खरंच हसू आवरणार नाही. येथे पाहा व्हिडीओ X वर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत एका युजरने लिहिले आहे, "त्यांचे शोधही त्यांच्यासारखेच आहेत." आणखी एका युजरने लिहिले, "तुम्ही काहीही म्हणा, पाकिस्तानी आश्चर्यकारक आहेत." हा व्हिडीओ '@AdityaRajKaul' नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.