पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीचे पत्रकार चाँद नवाब त्याच्या रिपोर्टिंगमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्याच्या रिपोर्टिंगची शैली पाहता अनेकांना हसू आवरत नाही. चाँद नवाब यांच्या पीटीसीची भूरळ बॉलिवूडलाही पडली होती. अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात चाँद नवाब यांच्या शैलीतील भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी केली होती. आता पुन्हा एकदा चाँद नवाब यांचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. कराचीतील समुद्र किनाऱ्यावर आलेल्या धुळीच्या वादळाचं वृत्तांकन केलं.

‘कराचीतील हवामान सध्या आल्हाददायक आहे. थंडगार वारे वाहत आहेत. वादळ पाहण्यासाठी शहरातून लोक इथे दाखल होत आहेत. माझे केस उडत आहेत, तोंडात धूळ जात आहे. मला डोळेही उघडता येत नाहीत. अंगकाठीनं बारिक असलेल्या लोकांनी समुद्रकिनारी येऊ नये, नाहीतर ते वार्‍यासोबत उडून जाऊ शकतात’ असं या व्हिडीओत चाँद नवाब सांगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Pakistan International Airlines
पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स डबघाईला; कर्जाच्या डोंगरामुळे कंपनीचे बहुसंख्य शेअर्स सरकार विकणार?

चाँद नवाब म्हणतात की, “कराचीचे हवामान इतके चांगले आहे की अशा हवामानाचा आनंद घेण्यासाठी लोकांना मध्यपूर्वेत जाण्याची गरज नाही.” व्हिडिओच्या शेवटी उंटावर बसून हवामानाविषयी माहिती देताना दिसतात. उंटावर बसल्यानंतर चाँद नवाब म्हणाले, ‘सध्या मी अरबस्तानच्या कोणत्याही वाळवंटात नसून कराचीच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. दुबई आणि सौदी अरेबियासारखे धुळीचे वादळ कराचीत अनुभवता येईल.” पत्रकार नाइला इनायत यांनी चाँद नवाबचा एक नवीन व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चाँद नवाब कराचीच्या धुळीच्या थंड वाऱ्यावर रिपोर्टिंग करत आहेत. अंगकाठीने बारीक लोकांना चेतावणी देतात की ते धुळीच्या वादळाने उडून जाऊ शकतात.’