scorecardresearch

पाकिस्तानी तरुणीचा भाजी बनवतानाचा नवा VIRAL VIDEO, लोक म्हणाले, “तुम्ही फक्त व्हिडीओसाठी काम करता का?”

तुम्हाला ती सुंदर पाकिस्तानी मुलगी आठवत असेल, जिचा रोटी बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता या तरूणीचा नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती नेहमीप्रमाणे दिलखेचक स्माईल देत भाजी बनवताना दिसून येतेय.

Pakistani-roti-making-girl-new-video-viral
(Photo: Instagram / ekiya5)

तुम्हाला ती सुंदर पाकिस्तानी मुलगी आठवत असेल, जिचा रोटी बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रोटी बनवतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लागोपाठ तिचे नव नवे व्हिडीओ सोशड मीडियावर धडकू लागले आणि त्याला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंदी देखील मिळाली. तिच्या व्हिडीओमधील दिलखेचक स्माईलने तर सारेच जण घायाळ आहेत. आता तिच्या चेहऱ्यावर कातिलाना स्माईल घेऊन भाजी बनवतानाचा नवा व्हिडीओ समोर आलाय. यापूर्वीप्रमाणेच हा नवा व्हिडीओ सुद्धा लोकांना खूपच आवडलाय. याआधी, तिचे कपडे धुताना आणि घरातील कामे करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले होते. तिचे सुंदर डोळे पाहून लोकांना तर भुरळ पडली आहे.

आता व्हायरल होत असलेल्या नव्या व्हिडीओमध्ये, मुलगी तपकिरी कुर्ता, काळ्या रंगाचा सलवार आणि दुपट्टा परिधान केलेली दिसत आहे. भाजी शिजवताना ती तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल देताना दिसून येत आहे. घराच्या एका कोपऱ्यात बसून शेगडीवर एका मोठ्या वाडग्यात सतत भाजी करत आहे.

आणखी वाचा : VIRAL : झोपलेल्या गर्लफ्रेंडच्या पापण्या उघडल्या आणि फोन अनलॉक करून १८ लाखांचा चूना लावला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Firing In Marraige : लग्नात नवरदेवाने नवरीचा हात पकडत हवेत केली फायरिंग; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

ही तपकिरी डोळ्यांची तरूणी पाकिस्तानची रहिवासी आहे आणि तिचं नाव अमिना रियाज असं आहे. ती पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराचीच्या बाहेरील भागात राहते. मात्र, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करणारी आमिना नाही. त्याच्या शेजारच्या एका मुलाने तिचे हे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक या तरूणीची जोरदार प्रशंसा करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistani roti making girl cooks vegetable curry in viral video internet gave such reaction google trending video today prp