पुन्हा चर्चेत आली ‘पाकिस्तानी गर्ल’; दिलखेचक स्माईलने घायाळ करणारा नवा VIDEO VIRAL

रोटी बनवणारी ‘पाकिस्तानी गर्ल’ तुम्हाला आठवतेय का? होय त्या सुंदर तरूणीहा एक नवा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तिच्या गोड स्माईलवर प्रत्येकजण घायाळ होतोय. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

pakistani-girl-new-video-viral
(Photo: Instagram/ ekiya5)

सोशल मीडियावर रोटी बनवणारी ‘पाकिस्तानी गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली सुंदर तरूणी तुम्हाला आठवतेय का? या तरुणीच्या सौंदर्यानं आधीच लोक घायाळ झाले आहेत. पण या पाकिस्तानी गर्लचे व्हिडीओ थांबण्याचं काही नाव घेत नाही आहेत. पाकिस्तानी गर्लचा आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या दिलखेचक स्माईलने लाखो लोकांचं मन जिंकलंय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण तिच्या स्माईलवर भाळताना दिसून येत आहेत. तुम्ही एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असले तरी काही व्हिडीओ असे असतात जे लोक कधीच विसरत नाहीत. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा असे व्हिडीओ शेअर केले जातात, तेव्हा ते पाहिल्याशिवाय रहावत नाही. असंच काहीसं घडलंय या सुंदर ‘पाकिस्तानी गर्ल’ अमीन रियाझसोबत. लोकांना रियाजचे प्रत्येक व्हिडीओ आवडत आहेत. काही काळापूर्वी रियाझचा रोटी बनवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. इतकंच नाही तर अमीन रियाजचं खूप कौतुकही झालं. त्यानंतर रियाझ टरबूज कापताना आणि भाजी कापतानाचे व्हिडीओ देखील बरेच व्हायरल झाले होते. नुकतचं तिचा आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये रियाज चाकूने बटाटे कापताना दिसतेय. पण सोबतच तिच्या चेहऱ्यावरची गोड स्माईल या व्हिडीओमधलं खास आकर्षण ठरतंय. नेटकऱ्यांना तिची ही स्टाईल खूपच आवडली आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे हे काय? साडीवर ब्लाऊज घालायला विसरली? त्याऐवजी मेहंदी काढली…हटके फॅशन स्टाईल पाहून लोक हैराण

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मसालेदार स्ट्रॉबेरी! कधी चव चाखली आहे का? VIRAL VIDEO पाहून नेटिझन्स संपातले

या नव्या व्हिडीओमध्ये अमीन रियाज ज्या पद्धतीने चेहऱ्यावर स्माईल देतेय, तसं तसं व्हिडीओ पाहणारे तिच्यावर फिदा होत आहेत. हा व्हिडीओ १० सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता, मात्र आतापर्यंत लोक हा व्हिडीओ पाहत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी गर्ल रियाज रंगीत सलवार सूटमध्ये दिसून येतेय. तसंच अर्धवट दिसणारी दुसरी मुलगीही तिला मदत करत आहे. सोशल मीडियावर ही तरूणी पाकिस्तानी गर्ल म्हणून प्रसिद्ध झालीय आणि ती अवघ्या १५ वर्षाची आहे.

‘ekiya5’ नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १.५ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ७८ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंट करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : थंडी वाजते म्हणून मुलीने ओढणी मागितली, तर पाहा आई काय म्हणाली?

अमिनाचा एक इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. या व्हिडीओचे 300k फॉलोअर्स आहेत. या पेजवर घरातील काम जसं की भाजी चिरणे, जेवण बनवणे आणि फळं चिरणं असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत. अमिनाचे अनेक व्हिडीओ फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातील लोकही लाईक करत आहेत. त्यामुळेच अमिनाचे अनेक व्हिडीओ भारतामध्येही व्हायरल होत आहेत. अनेक लोकांनी तर अमिनाचे व्हिडीओ स्वत:च्या अकाऊंटवरुनही शेअर केले आहेत. तसंच तिच्या सुंदरतेचं स्तुती करताना थकत नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistani roti making girl cuts potatoes in viral video with over 1 million views mashallah says internet google trending video today prp