Wari 2025 viral video: आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव मानला जातो. या काळात राज्यभरात भक्ती, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. अशातच पुणेकरांचा निरोप घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजाचीं पालखी रविवारी सायंकाळी दिवे घाट चढून सासवड मुक्कामी पोहचली. या ठिकाणी दोन रात्रीचा विसावा घेऊन आज म्हणजे मंगळवारी (दि. 24) सकाळी सासवडकरांचा निरोप घेऊन साकुर्डे मार्गे जेजुरी येथे मुक्कामी जाणार आहे. यावेळी विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो याची प्रचिती आली. एका वारकऱ्याला हॉर्ट अटॅक आल्यानंतर एक माऊली मदतीसाठी पुढे आली अन् काय घडलं पाहा. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असताना यातल्याच एका वारकऱ्याला दिवे घाट चढताना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी एका माऊलीनं पुढे येतं या वारकऱ्याला सीपीआर दिला. तर अनेकजण वारकऱ्याच्या मदतीसाठी धावून आले. यावरुनच प्रचिती आली की, “विठुराया कोणत्या रूपात कधी येईल सांगता येत नाही”

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाऊले चालची पंढरीची वाट” या गाण्याच्या ओळी शाश्वत वाटतात. वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेले अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख अनुभवणं आहे. बुधवारीच आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत.