scorecardresearch

पंडितजी बोलवत राहिले आणि वर वाट पाहत राहिला पण वधू…; बघा हा मजेशीर viral video

या नवरीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १८१ हजार लोकांनी बघितलं आहे.

bride slept at wedding
मजेशीर व्हिडीओ व्हायरल (फोटो: witty_wedding/Insatgram)

Viral Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास सोहळा असतो. वधू आणि वर त्यांच्या लग्नाची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू करतात, जी लग्नाच्या दिवसापर्यंत सुरू राहते. वधू आणि वर आपले लग्न खास बनवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतात. विशेषत: वधू तिच्या लग्नाची खूप तयारी करते. लग्नाच्या मंडपातील प्रवेशापासून ते नृत्य आणि पेहरावापर्यंत सर्व काही वधूने पूर्वनियोजित केलेले असते.

एवढ्या प्लॅनिंगनंतर लग्नाच्या दिवशी नवरीच झोपली तर काय? होय सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नववधू आपल्या लग्नाच्या दिवशीच मस्त झोपलेली दिसत (Bride Sleep At Her Wedding) आहे. तुम्हाला दिसेल की वधू झोपलेली आहे आणि पंडितजी तिला आवाज देत आहेत आणि नवरदेवही आपल्या वधूची वाट पाहत आहे. त्याच वेळी, या सर्वांची पर्वा न करता, वधू आनंदाने झोपून राहते.

(हे ही वाचा: अजब प्रेम कहाणी! विद्यार्थिनी चक्क शिक्षकालाच घेऊन पळाली; म्हणाली, “आता जगणं…”)

व्हिडीओ बनला चर्चेचा विषय

वधू स्वतःच्या लग्नात झोपल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोक व्हिडीओ पाहण्याचा आनंदही घेत आहेत. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मिरवणूक बँक्वेट हॉलमध्ये पोहोचली असून मंडपात वर आपल्या वधूची वाट पाहत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

(हे ही वाचा: Viral Video: गोविंदाच्या गाण्यावर रेल्वे स्टेशनवरच नाचू लागली महिला; लोकांनीही सोबत ठरला ठेका)

(हे ही वाचा: अ‍ॅटिट्यूड दाखवत रस्त्यावरून चालत होती मुलगी आणि पुढे…; बघा हा viral video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

झोपेली वधू लाल पेहरावात खूप सुंदर दिसत आहे. witty_wedding dance instagram account वर हा व्हिडीओ शेअर करा करणात आला आहे. ‘पंडित जी: वधुला बोलवा’ या मजेशीर कॅप्शनसह व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १८१ हजार लोकांनी बघितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pandit ji kept calling and groom was waiting but bride slept at her wedding ttg