Viral Video : आपल्या देशात टॅलेंटेड लोकांची कमतरता नाही. गाव खेड्यापासून शहरापर्यंत तुम्हाला प्रत्येक दोन किमी नंतर एक टॅलेंटेड व्यक्ती भेटेन. पूर्वी असे टॅलेंटेड लोक शोधणे कठीण होते पण आता सोशल मीडियाच्या जगात आपल्याला दर दिवशी नवनवीन टॅलेंटेड लोक बघायला मिळते. सोशल मीडियावर अनेक लोक त्यांची कला दाखवत व्हिडीओ शेअर करत असतात तर काही लोक इतरांच्या कला कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर टाकतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाणी पुरी विक्रेता अभिनेत्यांच्या आवाजात पाणी पुरी विकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. शाहरुख खान, सनी देओल आणि शक्ती कपूर यांचा आवाज काढत तो पाणी पुरी विकताना दिसतो. त्याचे हे टॅलेंट पाहून कोणीही कोणीची त्याचे चाहते होईल.

हेही वाचा : कात्री नव्हे तर ‘या’ वस्तूने कापले ‘त्याने’ तरुणीचे केस; VIDEO पाहून व्हाल थक्क अन् म्हणाल हा कोणता हेअरकट?

चक्क शाहरुख- सनीचा आवाज काढत विकतो पाणी पुरी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण पाणी पुरी विक्रेता पाणी पुरीचा गाडा घेऊन रस्त्याने जात असतो. अचानक तो त्याचा स्पीकर बाहेर काढतो आणि त्यावर शाहरुख खान, सनी देओल आणि शक्ती कपूरच्या आवाजात डायलॉग बोलतो. त्याची मिमिक्री पाहून कोणीही अवाक् होईल. हा तरुण विक्रेता मिमिक्री द्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतो जेणे करून लोक घराबाहेर पडून त्याच्याकडे पाणी पुरी खायला येईल. तरुणाचे हे टॅलेंट अनेकांना आवडेल. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : “स्त्री पुरुष समानता कागदोपत्री..”, वटपौर्णिमेनंतर पिंपरीतील महिलांनी मांडलं परखड मत; पुरुषांचं अनोखं सेलिब्रेशन पाहा

पाहा व्हिडीओ, येथे क्लिक करा

jitender_dubbing_artist07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “व्यवसायाबरोबर मनोरंजन” तर एका युजरने लिहिलेय, “भाऊ प्लीज याला कोणीतरी वॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये घेऊन जा. पाणी पुरी विकताना याचे टॅलेंट वाया जात आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “कलाकार” अनेक युजर्स व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. काही लोकांनी त्याला मदत करण्याचे आवाहन केले आहेत.