Pani Puri Video : पाणी पुरी असा पदार्थ आहे की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवजतो. क्वचितच कोणी असेल की ज्याला पाणी पुरी खायला आवडत नसेल. पाणी पुरी हा शब्द जरी ऐकला तरी तोंडाला पाणी सुटतं. जर तुम्हाला पाणी पुरी खूप आवडत असेल तर हा व्हिडीओ तुम्ही एकदा बघायलाच हवा.
तुम्हाला माहिती आहे का पाणी पुरीचं पाणी कसं तयार करतात? हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कदाचित खूप मोठा धक्का बसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये पाणी पुरीचं पाणी कसं तयार करतात, हे दाखवले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आंबट आणि गोड असे दोन प्रकारचे पाणी बनवताना दाखवले आहे. हे पाणी बनवताना अस्वच्छ भांड्यांचा आणि अस्वच्छ पाण्याचा वापर केला आहे. व्हिडीओ इतका किळसवाणा आहे की तुम्हाला कधीही बाहेरची पाणी पुरी खायची इच्छा होणार नाही.
स्वादिष्ट वाटणाऱ्या पाणी पुरीचे पाणी कसे तयार केले जाते, हे पाहून कदाचित काही लोकांना धक्का बसेल. स्वच्छता न पाळल्यामुळे अनेकदा बाहेरची पाणी पुरी खाल्ल्यानंतर आजारी पडण्याचा धोका वाढतो.
हेही वाचा : ” …खूप कष्ट घेतले घरच्यांकडून मिळवण्यास होकार” नवरीने उखाण्यात सांगितली लग्नाची व्यथा, VIDEO व्हायरल
yummybites_kt या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय. काही युजर्सनी जोरदार टिका केली आहे.
एका युजरने लिहिलेय, “ज्यांना पाणी पुरी आवडते त्यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा” तर एका युजरने लिहिलेय, “पाणी पुरी खाल्ल्यानंतर मी नेहमी आजारी पडतो”