Non Veg Pani Puri: ‘पाणीपुरी’ हा शब्द जरी उच्चारला तरी काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी खायला आवडते. एक फेमस स्ट्रीट फूड म्हणून पाणीपुरीची ओळख आहे. हल्ली पाणीपुरीचे अनेक नवनवीन प्रकार दिसून येतात.हल्लीच्या काळात विविध फ्लेव्हर्सच्या पाणी पुरी आल्या आहेत. पण क्लासिस पाणी पुरीची चव काही वेगळीच असते. पण ही रेसिपी इतकी साधी सरळ आणि लोकप्रिय असताना देखील काही दुकानदार भलतेच प्रयोग करून दाखवतात. ही मंडळी चॉकलेट पाणी पुरी, डोसा पाणी पुरी, मॅगी पाणी पुरी, आईस्क्रिम पाणी पुरी अशा अजब पदार्थांचे शोध लावतात. बरं, हे प्रयोग कमी होते म्हणून की काय आता एक नवा पदार्थ समोर आलाय. या पदार्थाला चिकन पाणी पुरी म्हणतात. म्हणजे यामध्ये भाजी ऐवजी चिकन किंवा मटण वापरलं जातं. आता हा पदार्थ पाहाता यापुढे शाकाहारी लोकांनी पाणी पुरी कशी खायची? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

शोरमा पाणीपुरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना ही अतरंगी पाणीपुरी आवडली आहे तर अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. नॉन-व्हेज प्रेमी जो शोरमा चवीनं खातात, त्याच शोरमाची ही पाणीपुरी बनवली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो व्यक्ती सुरुवातीला चिकन कापून घेतो मग ते बारीक कापतो. त्यानंतर बीट, कोबी कापून त्यावर चटणी, मेयोनीज टाकून ते मिक्स करतो. त्यानंतर तो ते मिश्रण चक्क पाणीपुरीमध्ये भरतो. अशा ५, ६ पुऱ्या तो शोरमाचं मिश्रण भरुन तयार करतो आणि त्यावर पुन्हा सॉस आणि चिज टाकून सर्व करतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबई-पुण्याच्या तरुणांना आनंद महिंद्रानी दाखवलं नवं बिझनेस मॉडेल; व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांनी VIDEO पाहाच

लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर हे विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात. या विचित्र पदार्थांना लोक फ्यूजन फूड असेही म्हणतात.यामध्ये काही प्रयोग यशस्वी होतात पण काही एवढे विचित्र होतात की, अगदी नको वाटतं. नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थांचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच हे विचित्र फूड कॉम्बिनेशन पुन्हा व्हायरल होतंय.